मंगरूळपीरच्या सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांची ओळख केवळ पदामुळे निर्माण होत नाही, तर त्यांच्या विचारांमुळे, कार्यामुळे आणि माणुसकीच्या जिव्हाळ्यामुळे निर्माण होते. नगरसेवक व गटनेते मा. गणेशभाऊ लक्ष्मीबाई रामचरणजी खोडे हे असेच एक सर्वस्पर्शी, जनाभिमुख आणि लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व आहे.
स्व. रामचरणजी खोडे यांच्या संस्कारांच्या शिदोरीत वाढलेले गणेशभाऊ यांनी लहानपणापासूनच समाजसेवा, प्रामाणिकपणा आणि लोकहिताची शिकवण आत्मसात केली. त्यांच्या वडिलांनी मंगरूळपीर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष म्हणून कार्य करत शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले. त्याच परंपरेचा वारसा पुढे नेत गणेशभाऊंनीही आपल्या कार्याने जनमानसात वेगळी ओळख निर्माण केली.
नगरपरिषदेमध्ये अनेक वर्षे वरिष्ठ बाबू म्हणून कार्यरत असताना त्यांनी प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून जबाबदारी पार पाडली. एखादा नागरिक समस्या घेऊन आला की ती स्वतःची समजून त्यावर मार्ग काढण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळेच आजही नगरपरिषदेच्या जुन्या आठवणी काढताना अनेक नागरिक गणेशभाऊंचे नाव आदराने घेतात.
परंतु गणेशभाऊंच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ताकद केवळ त्यांच्या सामाजिक कार्यात नाही, तर त्यांच्या अध्यात्मिक जीवनातही आहे. श्री गणपती बाप्पा आणि संत श्री गजानन महाराजांप्रती त्यांची असलेली नितांत श्रद्धा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. दिवसाची सुरुवात देवपूजा, नामस्मरण आणि भक्तिभावाने करणारे गणेशभाऊ हे धार्मिकतेचा दिखावा न करता ती आचरणात उतरविणारे व्यक्तिमत्त्व आहे. गजानन महाराजांच्या सेवेत आणि विचारांत त्यांची अखंड निष्ठा असून, कोणतेही महत्त्वाचे कार्य सुरू करण्यापूर्वी ते देवाचे स्मरण करतात. त्यांच्या मते, "माणसाने पदापेक्षा परमेश्वरावर विश्वास ठेवला पाहिजे आणि समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानली पाहिजे." त्यामुळेच त्यांच्या स्वभावात नम्रता, संयम आणि लोकांप्रती आत्मीयता दिसून येते.
नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतरही त्यांच्या वागण्यात सत्तेचा गर्व कधीच दिसला नाही. उलट जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी त्यांनी अधिक जोमाने काम सुरू ठेवले. आज मंगरूळपीर शहरातील सर्वसामान्य नागरिक, युवक, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्याशी त्यांचे स्नेहाचे नाते आहे.
गणेशभाऊंच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांचा हसतमुख स्वभाव आणि काम पूर्णत्वास नेण्याची जिद्द. एखादे काम हाती घेतले की ते पूर्ण झाल्याशिवाय स्वस्थ न बसणारा हा नेता जनतेच्या विश्वासाचा आधार बनला आहे. विकासकामांबाबत त्यांची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिली असून शहराच्या प्रगतीसाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.
त्यांच्या कार्यात दिखाऊपणा नाही, प्रसिद्धीचा हव्यास नाही, तर जनतेप्रती असलेली खरी बांधिलकी आहे. म्हणूनच ते केवळ नगरसेवक किंवा गटनेते नाहीत, तर अनेकांच्या दृष्टीने विश्वासाचे, आपुलकीचे आणि प्रेरणेचे केंद्र आहेत.
जनसेवेचा ध्यास ज्यांचा, लोकहिताचा विचार मोठा।
विकासाची वाट चालताना, साथ लाभे जनतेचा खरा।।
कर्तृत्वाने उंच भरारी, कार्यामध्ये सदैव आघाडी।
यश, कीर्ती अन् मान-सन्मान, लाभो आपणांस अखंड वाढी।।
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मंगरूळपीर शहरासह सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या सामाजिक, प्रशासकीय, धार्मिक आणि लोकहितवादी कार्याचा प्रवास असाच अविरत सुरू राहो, हीच सर्वांची भावना आहे.
ईश्वरचरणी मनोभावे प्रार्थना की, श्री गणपती बाप्पा आणि संत गजानन महाराजांची कृपादृष्टी त्यांच्यावर सदैव राहो. त्यांना निरोगी, आनंदी, दीर्घायुषी जीवन लाभो आणि जनसेवेच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात घडत राहो.
💐 मा. गणेशभाऊ लक्ष्मीबाई रामचरणजी खोडे 💐
नगरसेवक व गटनेते, मंगरूळपीर
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂
शुभेच्छुक :
सुधाकर चौधरी
संपादक – वाशिम खबर आवाज महाराष्ट्र 🌹🙏
0 Comments