Ticker

6/recent/ticker-posts

हसमुख स्वभाव, आपुलकीची नाती आणि विश्वासाचा व्यापार...कोंढाळीचे सुप्रसिद्ध व्यापारी योगेशजी टावरी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथील सुप्रसिद्ध व्यापारी योगेशजी टावरी हे नाव आज विश्वास, प्रामाणिकपणा आणि माणुसकीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. सदैव हसमुख, शांत, संयमी आणि सर्वांना आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी व्यवसाय क्षेत्रात यशस्वी वाटचाल केली. मात्र केवळ व्यापारच नव्हे तर ग्राहकांशी जपलेले आत्मीयतेचे नाते, मित्रपरिवाराशी असलेला जिव्हाळा आणि समाजातील प्रत्येक घटकाशी जोडलेली आपुलकी हीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे.

योगेशजींच्या व्यवहारात प्रामाणिकपणा, शब्दात गोडवा आणि स्वभावात साधेपणा दिसून येतो. त्यामुळेच ग्राहक त्यांच्याकडे केवळ व्यापारी म्हणून नव्हे तर विश्वासू मित्र म्हणून पाहतात. प्रत्येकाशी प्रेमाने वागणे, नाती जपणे आणि संकटात धावून जाणे हा त्यांचा स्वभावच बनला आहे.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करणाऱ्या काही ओळी —

"हास्यातून जिंकली मने,
आपुलकीतून जोडली नाती...
विश्वासाच्या भक्कम पायावर उभी केली,
यश आणि माणुसकीची संपन्न श्रीमंती..."

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार, ग्राहक, नातेवाईक आणि असंख्य शुभचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

ईश्वर त्यांना निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी आयुष्य देवो. त्यांच्या जीवनात आनंद, भरभराट, समाधान आणि उत्तरोत्तर प्रगती लाभो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.

🌹 योगेशजी टावरी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌹

"नाव मोठं करण्यासाठी संपत्ती लागत नाही,
माणसं जोडण्याची कला लागते...
आणि योगेशजी टावरी यांच्या ठायी
ही कला भरभरून लाभली आहे."

शुभेच्छुक :
🌹 सुधाकर चौधरी 🌹

Post a Comment

0 Comments