Ticker

6/recent/ticker-posts

ज्ञानकाशी इंग्लिश स्कूलच्या नवीन इमारतीचे २८ जून रोजी लोकार्पण


आमदार श्यामभाऊ खोडे यांच्या हस्ते होणार उद्घाटन; मान्यवरांची राहणार प्रमुख उपस्थिती

मंगरुळपीर | सुधाकर चौधरी

ज्ञानकाशी इंग्लिश स्कूल, वाशिम रोड, गोगलगव्ही काटा, मंगरुळपीर येथील नव्याने उभारण्यात आलेल्या शैक्षणिक इमारतीचे उद्घाटन रविवार, २८ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास परिसरातील पालक, नागरिक व शिक्षणप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार श्यामभाऊ खोडे (वाशिम-मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघ) यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार ॲड. किरणराव सरनाईक (शिक्षक मतदारसंघ, अमरावती), आमदार भावनाताई गवळी (विधान परिषद) तसेच आमदार संध्याताई ढवळे (कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघ) उपस्थित राहणार आहेत.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष अशोकभाऊ परतळकर, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे, भाजप प्रदेश सदस्य राजू पाटील राजे, भाजप जिल्हाध्यक्ष पुष्पकांत चितलांग, भाजप प्रदेश सदस्य सुरेशभाऊ लुंगे तसेच तहसीलदार किशोर शेळके उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मा. लक्ष्मीकांतजी महाकाळ (मा. सभापती) यांची उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानकाशी इंग्लिश स्कूलसंत रविदास बहुउद्देशीय व शिक्षण संस्था यांच्या वतीने करण्यात आले आहे. संस्थाध्यक्ष प्रा. संजय ज्ञानबा खिराडे व मुख्याध्यापिका तथा संचालिका सौ. चंचल संजयराव खिराडे यांनी सर्व नागरिक, पालक, विद्यार्थी व शिक्षणप्रेमींनी कार्यक्रमास उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments