पत्रकार, शिक्षक आणि साहित्यिक म्हणून समाजात वेगळी ओळख; विद्यार्थी, वाचक आणि मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव
कारंजा | प्रतिनिधी
पत्रकारिता, शिक्षण आणि साहित्य या तिन्ही क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक व आदर्श शिक्षक प्रज्ञानंद थोरात यांचा आज वाढदिवस उत्साहात साजरा होत असून विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, मित्रपरिवार व वाचकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
निर्भीड पत्रकार म्हणून ओळख असलेल्या प्रज्ञानंद थोरात यांनी आपल्या प्रभावी लेखणीतून समाजातील विविध प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली आहे. दैनिक लोकमत, दैनिक देशोन्नती आणि दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट या वृत्तपत्रांतून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या विषयांवर सातत्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. सत्याला प्राधान्य देत दबावाला न जुमानता वस्तुस्थिती मांडणे आणि वंचितांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणे, ही त्यांच्या पत्रकारितेची वैशिष्ट्ये आहेत.
पत्रकारितेबरोबरच ते खेडेकर विद्यालय, अकोला येथे शिक्षक म्हणून कार्यरत असून विद्यार्थ्यांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय आहेत. अभ्यासक्रमाबरोबरच संस्कार, सामाजिक भान आणि जीवनमूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे कार्य ते सातत्याने करीत आहेत. कठीण विषय सहज, सोप्या भाषेत समजावून सांगण्याची त्यांची शैली विद्यार्थ्यांना विशेष भावते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत.
साहित्य क्षेत्रातही त्यांनी आपल्या लेखणीतून सामाजिक जाणिवा जागृत करण्याचे कार्य केले आहे. संवेदनशील लेखन, अभ्यासपूर्ण विचार आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यामुळे त्यांना साहित्य व पत्रकारिता क्षेत्रात विशेष मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.
व्यावसायिक जबाबदाऱ्यांसोबतच जिवाभावाचा मित्र, सहकार्यशील व्यक्तिमत्त्व आणि संकटात धावून जाणारा माणूस म्हणूनही त्यांची ओळख आहे. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि माणुसकी ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जमेची बाजू मानली जाते.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरांतून त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
– शुभेच्छूक : संजय म. कडोळे
पत्रकार, महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त
कारंजा लाड, जि. वाशिम
0 Comments