उज्ज्वलजी बागोला यांच्या सुमधुर भजनांनी रंगणार भक्तिमय भजनसंध्या
मंगरुळनाथ : प्रतिनिधी — श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वानिमित्त मंगरुळनाथ शहरात शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य श्रीकृष्ण जन्माष्टमी व भक्तिमय भजनसंध्येचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांना श्रीकृष्ण भक्तीत तल्लीन होण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे.
हा भक्तिमय कार्यक्रम सायंकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला असून, विनोद पळळीकर यांच्या नवीन निवासस्थानी, मधुर सोसायटी, गणेश मंदिराजवळ, संभाजी नगर बायपास रोड, मंगरुळनाथ येथे कार्यक्रम होणार आहे.
या भजनसंध्येचे प्रमुख आकर्षण म्हणजे नागपूर येथील सुप्रसिद्ध भजन सादरकर्ते उज्ज्वलजी बागोला. त्यांच्या सुमधुर आवाजातील श्रीकृष्ण भक्तीपर भजनांचा आनंद उपस्थित भाविकांना घेता येणार आहे. श्रीकृष्णाच्या भक्तिरसात तल्लीन करणाऱ्या या विशेष भजनसंध्येला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
“श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन करणाऱ्या सुंदर भजनांचा आनंद घेण्यासाठी आपण आपल्या परिवारासह आवर्जून उपस्थित राहावे. ही नम्र विनंती आपली उपस्थिती हीच आमच्यासाठी आनंदाची व श्रीकृष्णाच्या चरणी भक्तीची सुंदर भेट असेल,” असे आयोजकांनी म्हटले आहे.
या कार्यक्रमाचे निमंत्रण विनोद रमेशराव पळळीकर, राम विनोद पळळीकर, हरी प्रमोद पळळीकर, प्रमोद रमेशराव पळळीकर, कृष्ण विनोद पळळीकर तसेच वसमत पळळीकर परिवार, मंगरुळनाथ यांच्या वतीने देण्यात आले आहे.
“श्रीकृष्ण भक्तीचा गजर… भजनांच्या स्वरांनी रंगणार जन्माष्टमीचा सोहळा!”
0 Comments