Ticker

6/recent/ticker-posts

अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेची आढावा बैठक उत्साहात संपन्न

राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारीला वेग; ग्राहक चळवळ अधिक सक्षम करण्याचा पदाधिकाऱ्यांचा निर्धार

मंगरूळपीर : ग्राहकांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेच्या वतीने मंगरूळपीर येथील जुन्या पंचायत समिती परिसरातील संघटनेच्या कार्यालयात आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे केंद्रीय राष्ट्रीय महासचिव बाळासाहेब पांडे होते.


यावेळी आगामी राष्ट्रीय अधिवेशनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मध्य प्रदेशातील भोपाळ येथे दि. ७ व ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले असून, या अधिवेशनाच्या अनुषंगाने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी करावयाच्या कार्याबाबत राष्ट्रीय महासचिव बाळासाहेब पांडे यांनी सविस्तर माहिती दिली.


संघटनेची विद्यमान कार्यकारिणी जैसे थे ठेवून पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदावरून संघटनेचे कार्य पुढे सुरू ठेवावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले. ज्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, अशा कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन पदोन्नती देऊन वरिष्ठ पदाची जबाबदारी देण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.


नवीन जबाबदारी स्वीकारणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे आवश्यक अर्ज राष्ट्रीय कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असून, अधिकृत ओळखपत्र प्राप्त झाल्यानंतर संबंधितांनी आपल्या पदाच्या माध्यमातून सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे करावे, असे आवाहन बाळासाहेब पांडे यांनी केले.

“ग्राहक हा बाजारव्यवस्थेचा केंद्रबिंदू असून, ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि त्यांच्या समस्या प्रभावीपणे मांडणे ही संघटनेची जबाबदारी आहे. ग्राहक चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने कार्य करावे,” असे आवाहनही त्यांनी केले.

पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती

या बैठकीला महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वनमाला पेंढारकर, विदर्भ उपाध्यक्ष जीवन हागवणे, विदर्भ सल्लागार अॅड. मनीषा दाभाडे, विदर्भ संपर्कप्रमुख सुधाकर चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष सुनील सपकाळ, उपाध्यक्ष प्रमोद पेंढारकर, सदस्य वाघमारेबाळकृष्ण राऊत यांच्यासह वाशिम जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

यामध्ये वाशिम जिल्हाध्यक्ष महिला विंग कविता भगत, वाशिम जिल्हाध्यक्ष प्रशांत भदाडे, मंगरूळपीर तालुकाध्यक्ष राजू मनोहर, सदस्य प्रकाश भगत, आशिष मनवर, प्रभाकर भेंडेकर, सुदाम भोंडणे, तसेच महिला सदस्य वर्षा पडघान, किरण इंगोले, अर्चना गावंडे, येऊना ताई बेलखडे, सोनल पेंढारकर, संगीता देशमुख यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वनमाला पेंढारकर यांनी केले. बैठकीचे प्रभावी संचालन विदर्भ संपर्कप्रमुख सुधाकर चौधरी यांनी केले, तर आभार कविता भगत यांनी मानले.

बैठकीच्या माध्यमातून आगामी राष्ट्रीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या कार्याला नवी दिशा देण्यासोबतच ग्राहकांच्या हक्कांसाठीची चळवळ अधिक व्यापक आणि संघटित करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments