Ticker

6/recent/ticker-posts

मोदींच्या वाढदिवसानिमित्त शनी मंदिरात भक्तीचा जागर!

मंगरूळपीरमध्ये भाजपचा भव्य सोहळा; आमदार शामभाऊ खोडे, जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तमभाऊ चितलांगे यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मंगरूळपीर | सुधाकर चौधरी :
देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मंगरूळपीर शहरातील श्री शनी मंदिरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. धार्मिक वातावरण, उत्साह आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या सहभागाने हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्यास आमदार शामभाऊ खोडे, भाजप वाशिम जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तमभाऊ चितलांगे यांच्यासह भाजपचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. भाजप महिला मोर्चाच्या वाशिम जिल्हा सचिव सौ. वर्षा नारायण बाहेती यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती.

श्री शनी मंदिरात धार्मिक विधी व प्रार्थना करून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी तसेच देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. उपस्थितांनी नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट

मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विविध आघाड्यांचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवा कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

राष्ट्रसेवा, जनसेवा आणि विकसित भारताचा संकल्प अधिक दृढ करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. शनी मंदिर परिसरात झालेल्या या कार्यक्रमाने भक्ती आणि राष्ट्रसेवेचा अनोखा संगम पाहायला मिळाला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. वर्षा नारायण बाहेती यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचे आभार व्यक्त केले.


“भक्तीच्या वातावरणात राष्ट्रसेवेचा संकल्प; मोदींच्या वाढदिवसानिमित्त मंगरूळपीरमध्ये भाजपचा उत्साह दुणावला!”

Post a Comment

0 Comments