Ticker

6/recent/ticker-posts

गौसेवा, वृक्षारोपण अन् वृद्धांचा सन्मान; बजरंग दल जिल्हा संयोजक करन ठाकुर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा


मनोरा : प्रतिनिधी

बजरंग दलाचे जिल्हा संयोजक करन ठाकुर यांचा वाढदिवस यंदा केवळ जल्लोषात नव्हे, तर विविध सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गौसेवा, वृक्षारोपण तसेच वृद्धांचा सन्मान अशा उपक्रमांतून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.


वाढदिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात लक्ष्मी पार्वती गोशाळेत गौमातेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी गोशाळेचे संचालक मधुकर डेरे यांनी करन ठाकुर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

यानंतर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी वृक्ष भेट देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. या वृक्षांचे करन ठाकुर यांच्या हस्ते रोपण करण्यात आले. वाढदिवसाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करण्यात आला.

त्यानंतर मुंगसाजी नगर येथील सहारा वृद्धाश्रमास भेट देऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वृद्धांना नाश्ता व फळांचे वाटप करण्यात आले. ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत वाढदिवस साजरा करण्यात आला.

दरम्यान, विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने करन ठाकुर यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

तालुक्यातील विविध ठिकाणीही करन ठाकुर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम, सत्कार व शुभेच्छांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने समाजसेवेची जोड देत साजरा करण्यात आलेला हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला.


Post a Comment

0 Comments