Ticker

6/recent/ticker-posts

जीएच रायसोनी विद्यापीठात जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात


पोस्टर सादरीकरण, वृक्षारोपण व रक्तदानातून विद्यार्थ्यांनी दिला आरोग्य आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश

अमरावती : प्रतिनिधी अनिता यादव

जीएच रायसोनी विद्यापीठ, अमरावती येथील स्कूल ऑफ फार्मसीच्या वतीने जागतिक फार्मासिस्ट दिन २०२६ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक स्वरूपाच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावर्षीच्या “आरोग्यपूर्ण भविष्यासाठी फार्मासिस्टांना सक्षम करणे” या संकल्पनेवर आधारित उपक्रमांमधून रुग्णसेवा, सार्वजनिक आरोग्य आणि समाजाच्या कल्याणात फार्मासिस्टांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्टुडंट फोरमचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सर्जनशीलता, संघभावना, संवादकौशल्य तसेच व्यावसायिक क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने या फोरमची सुरुवात करण्यात आली आहे.

जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी पोस्टर सादरीकरण व पोस्टर मेकिंग स्पर्धा, वृक्षारोपण अभियान तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वैज्ञानिक ज्ञान, सर्जनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. आरोग्याबरोबरच पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीचा संदेशही या उपक्रमांतून देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषदेचे समन्वयक तथा ड्रगिस्ट्स अँड केमिस्ट्स असोसिएशनचे सचिव डॉ. सागर आंदे यांनी फार्मासिस्ट दिनाच्या विशेष विषयावर मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानातून त्यांनी फार्मासिस्टांच्या बदलत्या भूमिकेवर, रुग्णकेंद्रित आरोग्यसेवेचे महत्त्व तसेच निरोगी समाजाच्या निर्मितीमध्ये फार्मसी व्यवसायाचे योगदान यावर प्रकाश टाकला.

यावेळी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, कुलसचिव डॉ. स्नेहिल जायसवाल आणि विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता डॉ. प्रशांत अवचट यांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्यांना पुरस्कार व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन स्कूल ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. नरेंद्र चंद्रा तसेच समन्वयक डॉ. बी. व्ही. नागार्जुन, डॉ. सचिन पडोळे आणि सहाय्यक प्राध्यापक अल्ताफ खान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एनएसएस अधिकारी सहाय्यक प्राध्यापक कैलाश वाधवानी, डॉ. चैताली निमजे, सहाय्यक प्राध्यापक करुणा माकेश्वर, सहाय्यक प्राध्यापक मेघा कोसरकर, सहाय्यक प्राध्यापक समीक्षा अजमीरे, सहाय्यक प्राध्यापक कृतिका हाडोले आणि सहाय्यक प्राध्यापक तन्वी कोकाटे यांच्या समितीने परिश्रम घेतले. शिक्षकेतर कर्मचारी रूपेश कलम्बे व गौरव इसल यांनीही व्यवस्थापनात महत्त्वपूर्ण सहकार्य केले.


Post a Comment

0 Comments