Ticker

6/recent/ticker-posts

११ वर्षीय चिमुकलीवरील अत्याचाराने मंगरूळपीर हादरले!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नागवडे ताईसाहेब यांच्या उपस्थितीत ज्योतीताई ठाकरे यांनी महिला आयोगाला निवेदन सादर केले; महिलांच्या हक्क व न्यायासाठी ठाम भूमिका


‘अशा कुकर्माला माफी नाही’; आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या — विविध संघटनांचा प्रशासनाला इशारा

ज्योतीताई ठाकरे यांचा महिला आयोगाकडे पाठपुरावा; चिमुकलीला न्याय मिळेपर्यंत आवाज उठविण्याचा निर्धार

गौरव भगवान म्हातारमारे विरुद्ध पॉक्सोसह गंभीर कलमांखाली गुन्हा; कठोरात कठोर शिक्षेसाठी विविध संघटना आक्रमक

ज्योतीताई ठाकरे यांचा महिला आयोगाकडे पाठपुरावा; ‘चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे’ — प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी

पुणे प्रतिनिधी : श्रावणी कामत : तालुक्यातील मोहरी शेतशिवारात अवघ्या ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची गंभीर घटना समोर आल्यानंतर मंगरूळपीर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी गौरव भगवान म्हातारमारे (वय २७, रा. मोहरी) याच्याविरुद्ध मंगरूळपीर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. अल्पवयीन मुलीला शेतात नेऊन अत्याचार केल्याची तसेच प्रकार कुणाला सांगितल्यास कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे.

या प्रकरणामुळे बालिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, न्यायालयात  आरोपीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी विविध सामाजिक व महिला संघटनांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे.

आरोपीचे नाव स्पष्ट; पॉक्सोसह गंभीर कलमांखाली गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात गौरव भगवान म्हातारमारे (वय २७ वर्षे, रा. मोहरी) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ६४(१), ६५(२), ३५१(२), ३५१(३) तसेच पॉक्सो कायदा २०१२ मधील कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

११ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचाराचा आरोप; धमकीमुळे कुटुंब हादरले

पोलिस तक्रारीनुसार, २० सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास ११ वर्षीय मुलगी घरी नसल्याने तिच्या आईने तिच्या मैत्रिणींकडे चौकशी केली. मुलगी घरी परतल्यानंतर ती घाबरलेल्या अवस्थेत असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. आईने विचारणा केली असता तिने गौरव म्हातारमारे याने तिला शेतात नेऊन जबरदस्ती केल्याचे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

तसेच, ही बाब कुणाला सांगितल्यास आई-वडील आणि बहिणीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. बदनामीच्या भीतीमुळे कुटुंबीयांनी सुरुवातीला तक्रार केली नसल्याचेही समोर आले आहे.

गणपती विसर्जनादरम्यान पुन्हा इशारा; अखेर पोलिसांत धाव

२६ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान आरोपीने पीडित मुलीला इशारा केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी २७ सप्टेंबर रोजी मंगरूळपीर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली.

ज्योतीताई ठाकरे आक्रमक; महिला आयोगाकडे निवेदन

या घटनेची गंभीर दखल घेत मंगरूळपीर येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्याध्यक्ष ज्योतीताई ठाकरे यांनी पीडितेला न्याय मिळावा यासाठी पुढाकार घेतला आहे.

ज्योतीताई ठाकरे यांनी महिला आयोगाकडे निवेदन सादर करून घटनेची सविस्तर माहिती दिली. पीडित मुलगी व तिच्या कुटुंबीयांना आवश्यक संरक्षण मिळावे, तपास कोणत्याही दबावाशिवाय निष्पक्षपणे व्हावा आणि न्यायालयीन प्रक्रियेत दोष सिद्ध झाल्यास आरोपीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.

“अवघ्या ११ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचाराची घटना समाजासाठी अत्यंत गंभीर आहे. पीडितेला केवळ सहानुभूती नको, तर न्याय हवा. दोष सिद्ध झाल्यास आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” अशी भूमिका ज्योतीताई ठाकरे यांनी मांडली.

विविध संघटनांचा प्रशासनाला इशारा

या घटनेनंतर विविध सामाजिक आणि महिला संघटनांकडून प्रशासनाकडे निवेदने व पाठपुरावा सुरू असून, अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई आवश्यक असल्याची मागणी करण्यात येत आहे.

तपासातील प्रत्येक पुरावा गांभीर्याने संकलित करून न्यायालयात प्रभावीपणे मांडावा, पीडित कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा दबाव अथवा धोका निर्माण होऊ नये आणि प्रकरणाचा न्यायालयीन निपटारा कायद्यानुसार प्रभावीपणे व्हावा, अशी मागणी होत आहे.

चिमुकलीच्या अश्रूंना न्याय मिळालाच पाहिजे!

या घटनेने समाजमन हेलावून गेले असून, आता प्रश्न केवळ गुन्हा दाखल करण्याचा नसून पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्याचा आहे. तिच्या सुरक्षिततेची हमी, कुटुंबाला संरक्षण आणि दोष सिद्ध झाल्यास आरोपीला कायद्यानुसार कठोर शिक्षा — यासाठी प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

“चिमुकलीच्या अश्रूंना न्याय मिळालाच पाहिजे;  कठोर शिक्षा झालीच पाहिजे!”

Post a Comment

0 Comments