Ticker

6/recent/ticker-posts

ज्योतीताई ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश!


ज्योतीताई ठाकरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; जिल्ह्यातील सहाही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश

माजी राज्यमंत्री सुभाषरावजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन; चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या सहकार्याने व पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडेही पाठपुरावा — मुख्यमंत्र्यांकडून प्रत्यक्ष पाहणी

वाशिम सुधाकर चौधरी : पावसातील दीर्घ खंडामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन आर्थिक संकटात सापडलेल्या वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासादायक निर्णय झाला आहे. राज्य शासनाने २६ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, वाशिम जिल्ह्यातील सर्व सहाही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांसाठी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करणाऱ्या राष्ट्रवादी महिला कार्याध्यक्ष ज्योतीताई मनोज ठाकरे यांच्या प्रयत्नांना या निर्णयामुळे सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आदरणीय माजी राज्यमंत्री सुभाषरावजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या सहकार्याने, ज्योतीताई ठाकरे यांनी वाशिम जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत शासनाचे लक्ष वेधत निवेदन सादर केले होते. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडेही वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला.

दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे तातडीने करावेत, शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, पीक कर्जवसुलीला दिलासा मिळावा आणि दुष्काळग्रस्त भागासाठी शासनाच्या सवलती लागू कराव्यात, अशा विविध मागण्या या पाठपुराव्यातून मांडण्यात आल्या होत्या.

निवेदनापासून शासननिर्णयापर्यंतचा प्रवास

वाशिम जिल्ह्यात पावसातील मोठ्या खंडामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, बाजरी, मका आदी खरीप पिकांवर गंभीर परिणाम झाला. अनेक भागांत पिकांची वाढ खुंटली, उत्पादनात घट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आणि शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले.

या पार्श्वभूमीवर ज्योतीताई मनोज ठाकरे यांनी माजी राज्यमंत्री सुभाषरावजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडे निवेदन सादर केले. शेतकऱ्यांची प्रत्यक्ष परिस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून देत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.

या मागणीसाठी वेळोवेळी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला. चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या सहकार्यानेही शेतकरीहिताच्या या मागणीला बळ देण्यात आले, तर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडेही दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत पाठपुरावा करण्यात आला.

मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर

दरम्यान, दुष्काळी परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी २४ सप्टेंबर २०२६ रोजी वाशिम जिल्ह्याचा दौरा केला. त्यांनी म्हसळा (कारंजा), मोहगव्हाण (मंगरूळपीर) आणि जऊळका (मालेगाव) येथील शेतशिवारांना भेट देऊन नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची अवस्था, पावसातील खंड, शेतीवरील खर्च आणि संभाव्य उत्पादनातील घट याबाबत माहिती घेतली. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना शासनाच्या माध्यमातून आवश्यक मदत देण्याबाबत आश्वस्त करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांच्या या प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यानंतर दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आणि अखेर २६ सप्टेंबर रोजी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली.

वाशिमचे सहाही तालुके दुष्काळाच्या कक्षेत

वाशिम जिल्ह्यातील—

वाशिम | रिसोड | मालेगाव | मंगरूळपीर | कारंजा | मानोरा

या सहाही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश झाल्याने संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या दुष्काळ निवारण उपाययोजनांचा नियमानुसार लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, ‘ट्रिगर-१’ निकष पूर्ण झालेल्या तालुक्यांचा यात समावेश आहे.

दुष्काळ जाहीर; आता मदतीच्या अंमलबजावणीकडे लक्ष

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना नियमानुसार विविध सवलती व मदत मिळण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दुष्काळाची अधिसूचना जारी झाल्यानंतर संबंधित सवलती लागू होण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे सांगितले आहे.

यामध्ये नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे, पीक कर्जाचे पुनर्गठन, जमीन महसुलातील सवलती, कृषी पंपांच्या वीजबिलाबाबतच्या सवलती तसेच पाणी व चारा व्यवस्थापनासारख्या उपाययोजनांचा समावेश नियमानुसार होऊ शकतो.

आता दुष्काळ जाहीर झाल्यानंतर पंचनामे अचूक व वेळेत पूर्ण होणे आणि पात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळणे, ही पुढील महत्त्वाची बाब ठरणार आहे.

‘निवेदनापासून बांधावर पाहणीपर्यंतचा प्रवास’

“आदरणीय माजी राज्यमंत्री सुभाषरावजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या सहकार्याने आम्ही वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीबाबत शासनाकडे निवेदन सादर केले. पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडेही वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी वाशिम जिल्ह्यात येऊन प्रत्यक्ष शेतशिवारांची पाहणी केली आणि आता शासनाने जिल्ह्यातील सर्व सहाही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे,” अशी प्रतिक्रिया ज्योतीताई मनोज ठाकरे यांनी व्यक्त केली.

“मात्र केवळ दुष्काळ जाहीर होणे पुरेसे नसून पात्र शेतकऱ्यांना मदत वेळेत, पारदर्शकपणे आणि कोणत्याही अनावश्यक विलंबाशिवाय मिळावी, यासाठी आमचा पाठपुरावा यापुढेही सुरूच राहील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांचे आभार

वाशिम जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत प्रत्यक्ष शेतशिवारांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्याबद्दल मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे ज्योतीताई ठाकरे यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

तसेच शासन स्तरावर शेतकरीहितासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल मा. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार साहेब आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत सहकार्य केल्याबद्दल पालकमंत्री दत्तामामा भरणे साहेब यांचेही त्यांनी आभार मानले.

यासोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने मार्गदर्शन करणारे आदरणीय माजी राज्यमंत्री सुभाषरावजी ठाकरे साहेब तसेच चंद्रकांत दादा ठाकरे यांचेही ज्योतीताई ठाकरे यांनी विशेष आभार व्यक्त केले.

निवेदन दिले, पाठपुरावा केला; अखेर वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर!

आता दुष्काळाची घोषणा कागदावर न राहता मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात आणि बांधावर पोहोचण्याची अपेक्षा!

ज्योतीताई मनोज ठाकरे
राष्ट्रवादी महिला कार्याध्यक्ष, वाशिम जिल्हा

Post a Comment

0 Comments