Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जैन संघटनेच्या वतीने सोमाणी व बागरेचा सन्मानित

भारतीय जैन संघटनेच्या वतीने सोमाणी व बागरेचा सन्मानित
वाशीम - जिल्ह्यात सुजलाम सुफलाम अभियान यशस्वीपणे राबवून भारतीय जैन संघटनेच्या वतीने अनेक सामाजीक उपक्रम घेतल्याबद्दल बिजेएसच्या अकोला येथील रामलता बिझनेस सेंटरमधील जैन हॉटेल सभागृहात 11 नोव्हेंबर रोजी आयोजित विभागीय कार्यशाळा बैठकीत सुजलाम सुफलामचे जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा व भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांचा राज्य अध्यक्ष हस्तीमल बंब, विदर्भ अध्यक्ष संजय आंचलीया, सचिव धमेंद्र मुनोत, अकोला जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष गादीया, राष्ट्रीय मंत्री संजय शिंगी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी निलेश सोमाणी यांनी वाशीम जिल्हयात संघटनेच्या वतीने दिनदर्शिका, कोल्हापूर येथील आपादग्रस्तांना 11 हजार रुपयाची मदत, सुजलाम सुफलाम अभियान, मुल्यवर्धन कार्यशाळा व शिक्षक, केंद्रप्रमुखांचा सत्कार सोहळा, शिक्षणसंस्था चालक व कोचिंग क्लासेस संचालकांचा सत्कार सोहळा, दिवाळीनिमित्त गरजवंतांना फराळाचे वाटप, चेतन सेवांकुर संस्थेला मदत समवेत विविध उपक्रम राबविल्याची माहिती दिली. सोबतच लवकरच वाशीम येथे अल्पसंख्यांक कार्यशाळा, कन्यापूजन महोत्सव व स्मार्ट गर्ल कार्यशाळा आयोजित करणार असल्याचे सांगीतले. यावेळी संजय आंचलीया यांनी बागरेचा व सोमाणी यांच्या कार्याची प्रशंसा केली. कार्यशाळेला विदर्भातील पदाधिकारी व अमरावती विभागातील पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व सचिव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments