Ticker

6/recent/ticker-posts

महर्षी वाल्मिकी, सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांना अभिवादन

वाशिम, दि. ३१ : महर्षी वाल्मिकी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी महर्षी वाल्मिकी, सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच यावेळी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सहाय्यक अधीक्षक श्री. नागपुरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments