Ticker

6/recent/ticker-posts

घरात चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर छापा



पालघर : विरार ग्लोबल सिटी येथे घरात चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर छापा  टाकून अनैतिक मानवी वाहतूक शाखेने सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करून ३ पीडीत मुलींची सुटका केली असून २ आरोपींना अटक केली आहे. विरार ग्लोबल सिटी इडन रोझ महावीर गार्डन येथे वेश्या दलाल दर्शना बाने व दयानंद बाने हे कमिशन घेऊन वेश्यागमना साठी मुली पुरवितात अशी बातमी मिळाली होती.
त्यानंतर पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, पालघर, कार्यालय-नालासोपारा येथे दोन पंचांना बोलावून घेऊन, बोगस गि-हाईक पाठवून अनैतिक मानवी वाहतुक कक्षाचे पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे ,अमोल बोरकर,महेश यशवंत गोसावी, बी.एम.पवार, श्याम शिंदे किणी, कांटेला, डोईफोडे, जगदाळे, यांनी छापा टाकून दर्शना बाने, दयानंद बाने यांना अटक करून ३ पिडीत मुलींची सुटका केली आहे.


Post a Comment

0 Comments