Ticker

6/recent/ticker-posts

गुडवणवाडी येथील महिलांचे पाण्यासाठी आमदारांना साकडे.. ठक्करबाप्पा मधून विहीर मंजूर करण्याचे आमदारांचे आश्वासन


 वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे प्रतिनिधी 
● गुरुनाथ नेमाने
    
नेरळ ता.कर्जत ◆
तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या गुडवणवाडी मधील आदिवासी महिलांनी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेऊन वाडीमधील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्याची विनंती केली.गुडवणवाडी मध्ये आदिवासी विकास विभागाकडून विहीर मंजूर करून घेऊन याच वर्षी पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन आमदार थोरवे यांनी आदिवासी ग्रामस्थांना दिले.
   
 
तसेच बोरिवली ग्रामपंचायतमध्ये असलेल्या गुडवणवाडी मध्ये सुगवे आणि सहा गावांच्या नळपाणी योजनेचे पाणी पोहचत नाही.त्यामुळे गुडवणवाडी मध्ये आदिवासी लोकांना पिण्याचे पाण्यासाठी साधारण एक किलोमीटर अंतरावरून आणावे लागत आहे.त्यामुळे गुडवणवाडी मधील आदिवासी महिलांनी आज 28 नोव्हेंबर रोजी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांची त्यांच्या कार्यलयात भेट घेऊन आपल्या वाडीमधील पाणी समस्या मांडली. 

त्यावेळी गुडवण वाडी मधील आदिवासी महिला सुरेखा पुंजारा,दामिनी निर्गुडा,रेवती पारधी,ताई पुंजारा,ज्योती पुंजारा,रुपाली खंडवी यांनी आपल्या वाडीमधील तरुण कार्यकर्ते अनंता पुंजारा,रोहिदास पुंजारा,शंकर खंडवी,रामू निर्गुडा,सुनील खंडवी, पांडुरंग निर्गुडा यांनी आपल्या समस्या मांडल्या.त्यात नळपाणी योजनेचे पाणी वाडीमध्ये पोहचले नाही.त्यामुळे आमच्या वाडीमधील महिलांना खड्ड्याच्या रस्त्यातून खाली उतरून चिल्हार नदीमधून पाणी उचलून डोंगर चढून न्यावे लागत असल्याची समस्या मांडली.त्यात वाडीमध्ये एक जागा असून त्या जागेत जून महिन्यापर्यंत पाणी असते.त्यामुळे तेथे विहीर खोदण्याची मागणी गुडवणवाडी आदिवासी वाडीमधील ग्रामस्थ यांनी आपली समस्या मांडली.
        
यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी सुगवे नळपाणी योजना पाहणाऱ्या सर्वांना बोलावून घेण्याच्या सूचना जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाच्या उपअभियंता यांना दिल्या.मात्र नळपाणी योजनेचे पाणी पोहचत नसल्याने आदिवासी ग्रामस्थांना यावर्षी कोणत्याही अवस्थेत पाणी मिळाले पाहिजे,यासाठी आदिवासी विकास योजनेच्या पेण येथील एकात्मिक आदिवासी उपयोजना यामधून विहीर मंजूर करण्याचे आश्वासन यावेळी दिले. 
त्याचवेळी डिसेंबर महिन्यात या विहिरीचे बांधकाम सुरू करण्यासाठी आपण स्वतः गुडवणवाडी येऊ असे आश्वासन देखील आमदार महेंद्र थोरवे यांनी आदिवासी ग्रामस्थांना दिले. याप्रसंगी बोरिवली ग्रामपंचायतचे माजी सरपंच रामचंद्र मिणमिणे, ग्रामपंचायतचे उपसरपंच रुपेश खडे,ग्रामपंचायत सदस्य निलेश म्हसे,यांच्यासह जेष्ठ कार्यकर्ते दीपक भोईर,बापू भोईर,सुरेश भोईर,आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments