Ticker

6/recent/ticker-posts

१०८ रुग्णवाहिका जिल्ह्यासाठीच ठरली जीवन संजीवनी



वाशिम जिल्ह्यातील आरोग्य विभागाशी समन्वय
साधून भारत विकास ग्रुप मार्फत ◆ १०८ रुग्णवाहिका तळागाळातील जनसामान्यांसाठी सेवा देत आहे . जगावर पडलेलं कोरोना सारख्या महामारीचे संकट लक्षात घेता २४ तास सज्ज असते. आपत्तीच्या कोणत्याही वेळी रुग्णवाहिका लागल्यास ◆ १०८ वर फोन आल्याबरोबर  तात्काळ जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या रुळणवाहिकेची लोकेशन घेवून होईल तेवळ्या लवकर रुग्णवाहिका पोहचविण्याचे सरोत्परी प्रयत्न करीत असतो. असे मत वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी यांच्याशी बोलताना म्हटले-अजिंक्य लवंगे जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र शासन व भारत विकास ग्रुप यांच्या संयुक्त उपक्रम म्हणजे ◆ १०८ रुग्णवाहिका ही या कोरोणा या महामारीच्या काळात वाढता पादुर्भाव पाहता संभाव्य धोका टाळण्यासाठी व कोरोना संशयित किंवा बाधित व्यक्तीला कोविड सेंटरला पोहोचवणे व रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना घरी सोडणे या सर्व काळात ◆ १०८ रुग्णवाहिका ही रुग्णांसाठी जीवनदायी ठरली आहे. या महामारी च्या काळात रुग्णांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा वेगळा होता. या काळात खाजगी वाहने बंद होती परंतु दवाखान्यासाठी जाण्या येण्या करिता रुग्णांसाठी मुभा ही होती. परंतु कोरोनाचे नाव ऐकताच खाजगी वाहन चालक हे हॉस्पिटल ला जाण्यास नकार देत होते. कारण त्यांना ही भीती होती की
बाधितांच्या संपर्कास आल्यास हा कोरोना आपल्यालाही होऊ शकतो अशी भिती प्रत्येकाच्या मनात होती अशा कठीण काळात ◆ १०८ रुग्णवाहिका त्यावरील ड्रायव्हर व डॉक्टर यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले सामाजिक भान न विसरता योग्यरीत्या सेवा देण्याचे काम केले. मग ती कोणतीही वेळ असो शहरापासून ते गाव खेड्यापर्यंत ◆ १०८ ही रुग्णवाहिका रुग्णांसाठी धावून गेली. रुग्णांना ने-आण करण्याच्या काळात या रुग्णवाहिकेला निजंतुकीकरण करण्याचे कामही मोठ्या जबाबदारीने करण्यात आले. ड्रायव्हरचे  आणि डॉक्टरचे खूप मोठ्या प्रमाणात ये ले झाले आतापर्यंत ◆ १०८ या रुग्णवाहिकेत ने २०/०३/२०२० पासून २७/११/२०२० आजपर्यंत ६०६२ रिकव्हर पेशंट ५८३५ मृत्यू पावल्याची संख्या १४७ सध्याच्या स्थितीत असलेले पेशंट ७८ पर्यंत एकूण ४ हजार ६९३ कोरोना संबंधित रुग्णांना रुग्णालयात पोहोचवण्याचे काम केले. तसेच संशयित रुग्णांना कोविड सेंटरला पोहोचणे व निगेटीव्ह रुग्णांना घरी सोडणे या सेवेेचाही समावेश आहे. तसेच ◆१०८ रुग्णवाहिका २०१४ पासून कार्यरत आहे. या रुग्णवाहिके मध्ये २०१४ ते ऑक्टोंबर २०२० पर्यंत एकूण ३५० प्रस्तुती या ◆१०८ रुग्णवाहिकेत योग्यरीत्या व डॉक्टरांच्या उपस्थितीत झाल्या आहेत. तसेच १८७ ,घरी झालेल्या प्रस्तुतीचा योग्य ते उपचार व या महिन्याचा प्राप्त व्हाल R T A ७३, भांडण-तंटा  प्रकरणातील ११, जळालेले  ४, हृदय विकाराच्या अट्याक आलेले ३ ,पडलेले ९ ,विष घेतलेले ३२, A NC & PNC २५३, विज पडून जखमी झालेला १ ,रोड अपघात १३, मेडिकल ५०५ ,आत्महत्या प्रकरणातील १ , आधार मधले २6८ ,पुढील मार्गदर्शन केलेले आहे. अशा सर्व बाबींमुळे १०८ ही रुग्णवाहिका जिल्ह्यासाठी खरोखर ठरली जीवन संजीवनी म्हटले तरी वावगे ठरणार नाही
यांच्या कार्याला वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या वतीने मानाचा मुजरा



Post a Comment

0 Comments