मुंबई | दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी काल संवाद साधला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका असं सांगितलंय.
तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला समर्थन दिलंय आहे. लता मंगेशकर यांनी सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना तसंच राज्यातील जनतेला फटाके न फोडण्याचं आवाहन केलंय.लता मंगेशकर म्हणाल्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना जे सांगितलं, त्याची आपण अंमलबजावणी करणं खूप आवश्यक आहे, असं मला वाटतं.
यंदाच्या दिवाळीत कमीत कमी फटाके फोडूया आणि प्रदूषण टाळूया. सर्वांनी प्रकाशपर्व, दीपोत्सव साजरा करूया. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे. सर्वांनी मास्क अवश्य वापरावा, असंही लता मंगेशकर यांनी सांगितलंय.
0 Comments