Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकार कु.किरण चौधरी यांना कोरोना प्रहार योद्धा म्हणून सन्मानित





 वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या वतीने कुमारी किरण चौधरी यांचे हार्दिक अभिनंदन

कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता कोविड -19 कोरोना महामारी आपत्तीजन्य संकट काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेच्या आरोग्यासाठी कोरोना विरुद्ध लढ्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तुळजापूर येथील पत्रकार कु. किरण चौधरी यांना कोरोना प्रहार योद्धा म्हणून सन्मानित करून सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष जयराज कोळी, उपाध्यक्ष दगडू माने, युवक अध्यक्ष अनिस मुजावर, कार्याध्यक्ष अभिजित खोत, शहराध्यक्ष अजय डांगे यांनी, कु.चौधरी यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या तर अनेक मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. प्रहार संघटना ही जनसामान्यांच्या हितासाठी कार्यकर्ते प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांचा स्वभाव कसा आहे जे कुणी गोरगरिबांच्या सेवेत कार्य करत असेल त्यांचा मात्र सलमान करतात भ्रष्ट व मुजोर अधिकाऱ्याच्या मग ते कानाखाली मारण्यास मागे पुढे पाहत नाही अशा प्रहार संघटनेच्या वतीने सन्मान करणे म्हणजे पत्रकारांच्या आयुष्यातील केलेल्या कार्याची खूप मोठी पावती आमच्या पत्रकारांचा सन्मान केल्याबद्दल प्रहार संघटनेचे मनपूर्वक आभार वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी

Post a Comment

0 Comments