--------------------------------
मुर्तीजापूर येथील एका महाविद्यालयातील प्राचार्याने त्याच महाविद्यालयातील एका प्राध्यापक महिलेस शरीर सुखाची मागणी करून तिचा मानसिक छेळ करणाऱ्या प्राचार्य व सिनेट सदस्य असलेल्या आणि शिक्षेकी पेशास काळीमा फासणाऱ्या " त्या " प्राचार्याचा ' लेकीबाळी अब्रूरक्षा क्रांतीबंड ' या चळवळीच्या वतीने जाहिर निषेध करण्यात येत आहे .
या प्रकरणी त्या महिला प्राध्यापिकेने मुर्तीजापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करूनही तक्रारीपूर्वी त्यांनी अमरावती येथे पत्रपरिषदेत प्राचार्यांच्या कृत्यांचा पर्दाफाश केला होता. महिला प्राध्यापिकेने दिलेल्या तक्रारीतून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत . सदरील प्राचार्य यांनी फिर्यादी प्राध्यापक महिलेस मुर्तीजापूर येथील आपल्या फ्लॅटवर बोलावून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याशिवाय सातवा वेतन आयोग लागू होऊ होवू देणार नाही नसल्याचे तक्रारीत नमूद आहे . फिर्यादी प्राध्यापक महिला २००९ पासून मुर्तीजापूर येथील एका महाविद्यालयात कार्यरत आहेत .तर ते प्राचार्य २२ जून २०१६ पासून रूजू झाले .हे प्राचार्य त्या प्राध्यापक महिलेसोबत जवळीक निर्माण करून लगट करण्याचा सतत प्रयत्न करीत होते , असे प्राप्त तक्रारीत नमूद आहे .
त्या नराधम प्राचार्याने फिर्यादी प्राध्यापक महिलेस अमरावती येथे कारने सोडून देण्याच्या बहाण्याने मुद्दामहून लगट साधण्याचा प्रयत्न केला .प्रमोशनचे आमिश देखील दाखवण्यात आले .याच काळात त्यांनी फिर्यादी महिलेवर प्रेम असल्याचे सांगून युरोप टूरवर नेण्याचे देखील आमिश दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे .
४ आॅगष्ट २०१९ रोजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत स्वच्छता अभियान सुरू सुरू असताना अन्य प्राध्यापकांसमोर मैदानावर प्राचार्य यांनी आपणास अश्लील भाषेत शिवीगाळ करून आपणास निलंबित करण्याची धमकी दिली .त्यांनी शैक्षणिक कार्यात व्यत्यय आणून त्रास देण्याचा सतत प्रयत्न केला .
या प्रकरणी ' लेकीबाळी अब्रूरक्षा क्रांतीबंड ' विशेष लक्ष घालून त्या पीडित प्राध्यापक महिलेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्या नालायक प्राचार्याचे तात्काळ निलंबन व त्याचे सिनेटचे पद रद्द करण्याची मागणी संबंधीतांकडे एका निवेदनाद्वारे करणार असून गरज पडल्यास तीव्र आंदोलन छेडण्यासाठी देखील तयार राहणार आहे .
तसेच लवकरच या प्रकरणी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन या मुद्याकडे त्यांचे लक्ष वेधून घेणार आहे .

0 Comments