Ticker

6/recent/ticker-posts

पुरुषोत्तम चितलांगे महाराष्ट्र प्रदेश भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्यपदी


पुरुषोत्तम चितलांगे महाराष्ट्र प्रदेश भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्यपदी

मंगरूळपीर येथिल नगर सेवक माजी जिल्हासरचिटणीस व चितलांगे गॅस चे संचालक दिलदार मनाचा राजा असणारे पुरुषोत्तम लालचंद चितलांगे यांची महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारीणी सदस्यपदी नियुक्ती भाजपा प्रदेशाध्यक्षा आ.मा.चंद्रकांतदादा पाटिल यांनी नुकतीच केली असुन तसे नियुक्तपत्र  अमरावती येथे देण्यात आले आहे भाजपाच्या विभागीय बैठकीत चंद्रकांतदादा पाटिल,आ.राजेंद्रजी पाटणी,यांच्या हस्ते देण्यात आले.सन 1990 पासुन पुरुषोत्तम चितलांगे यांनीराष्ट्रिय स्वयंमसेवक संघ ते भाजपाच्या विविध जबाबदाऱ्या सांभाळून अविरतपणे पक्ष हिताचे कार्य केले आहे सामाजीक सांस्कृतीक व विविध क्षेत्रात त्यांचे कार्य अविरत सुरु असते. पक्षीय माध्यमातुन सर्वच घटकांना त्यांनी न्याय दिलेला आहे. त्यांनी आपल्या भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी प्रदेश सदस्यपदी नियुक्तीचे श्रेय वरिष्ठ भाजपा नेत्यांसोबत त्यांचे मार्गदर्शक आ.चंद्रकांतदादा पाटिल, डॉ.आ.रामदासजी आंबटकर डॉ.उपेद्रजी कोठेकर,भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेद्रजी पाटणी,आ.लखनजी मलीक,सुरेशभाऊ लुंगे, राजु पाटिल राजे,मा.विजयराव जाधव,नरेद्रजी गोलेच्छा, सुनिलजी राजे, इत्यांदीसह पक्षाचे जिल्ह्यातील नेत्यांना दिले असुन त्यांच्या या नियुक्तीने एका सर्वसामान्य कार्यकरत्याला न्याय दिल्याची प्रतिक्रीया अनेक कार्यकत्यानी व्यक्त केली. व त्यांच्या नियुक्ती झाल्यानंतर फटाके फोडुन कार्यकात्यांनी जल्लोश केला. ही जबाबदारी पक्षाने यांनी केलेल्या कार्याची पावती असून आज पर्यंत ज्या पद्धतीने कार्य केले त्याहीपेक्षा आणखी चोखपणे पक्षासाठी कार्य करू असेही याप्रसंगी पुरुषोत्तम चितलांगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले

Post a Comment

0 Comments