Ticker

6/recent/ticker-posts

फाशी घेण्याची वेळ आली होती, इतकं भाजपातील एका व्यक्तीने छळलं : एकनाथ खडसे

फाशी घेण्याची वेळ आली होती, इतकं भाजपातील एका व्यक्तीने छळलं : एकनाथ खडसे

 फाशी घेण्याची वेळ आली होती, इतकं भाजपमधल्या एका व्यक्तीने मला छळलं अशा शब्दात माजी मंत्री एकनाथ खडसे ( यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीसांवर  घणाघाती टीका केली आहे. आता फक्त दोनच पक्ष राहिले. यापुढे महाविकासआघाडी आणि राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार अशी गर्जनाही एकनाथ खडसेंनी केली. ते जळगावच्या 

मुक्ताईनगर इथं बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली आहे.

‘मला अक्कल शिकायला चालले होते. मी अख्खं आयुष्य भारतीय जनता पार्टीला दिलं. माझा मुलगा गेला तरीही मी भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहिलो. पण मला एका माणसाने छेळलं.’ असं म्हणत खडसेंनी देवेंद्र फडवणीस यांना टोला लगावला आहे. मी भल्याभल्यांना मुख्यमंत्रीपद दान करत असतो. त्यामुळे असं समजा की उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीचा दावेदार असलेलं हे पद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिलं. गल्लीतले कार्यकर्ते मी मोठे केले आणि आता तेच मला अक्कल शिकवायला लागले असंही म्हणत खडसेंनी भाजपवर टीका केली आहे.

Post a Comment

0 Comments