मंगरुळपीर : भारतरत्न डॉ.बाबासाहेबआंबेडकर स्वाधार योजनेच्या उर्वरीत विद्यार्थ्याची परतावा रक्कम तात्काळ देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुलदेव मनवर यांनी मा.सामाजीक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदनाद्वारे केली आहे.दि. १७ रोजी मनवर यांनी पाठवीलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी दि. १३ मे रोजी अमरावती विभागीय उपायुक्त यांना सत्र २०१९- २० च्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या राज्यभरातील लाभार्थ्यांकरीता निधी पाठविण्याबाबत निवेदन दिले होते. त्यावर त्यांनी आयुक्त समाज कल्याण पुणे यांना पत्र पाठवीले होते. तसेच मा.सामाजीक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन पाठवीले होते. याचा पाठपुरावा केला होता. मात्र शासनाने त्यावेळी लॉकडावूनमूळे १०० कोटीच्या मागणीवर दि. २८ऑगष्ट रोजी फक्त ३५ कोटी रु. एवढाच निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र अजूनपर्यंत उर्वरीत रक्कम पाठविलेली नसल्याने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील अर्ज केलेले हजारो विद्यार्थी पैसे मिळण्यापासून वंचीत राहीलेले आहेत.यामूळे विद्यार्थी व पालकांना शैक्षणीकदृष्ट्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून त्यांच्या शैक्षणीक व कौटुंबीक भवितव्यावर याचा मोठा दुष्परीणाम होत आहे. याकरीता आपले स्तरावरून तातडीने याबाबत कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.त्यामूळे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील अर्ज केलेल्या हजारो विद्यार्थ्यांना याचा लवकरच रक्कम मिळणार असल्याचे मनवर यांनी सांगितले आहे.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)

0 Comments