◆लोणावळा प्रतिनिधी श्रावणी कामत◆
जगाचा कारभार आपल्यालाच हाकाचाय अशा अविर्भावात आपली दिनचर्या सुरू होते.दिवस कधी संपतो लक्षात येत नाही. घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावपळ होते.या दगदगीच्या जमान्यात शरीर व कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. त्याचा मोबदला (पगार,पैसे) किती मिळतात हा दुसरा भाग.
असो.....अशा सततच्या धावपळीच्या व दगदगीच्या दिनचर्यामुळे शरीराला अनेक व्याधी सुरू होतात ते आपल्याला लक्षात ही येत नाही.तपासणीसाठी दवाखान्यात जाण्यास वेळ ही नसतो. आज जाऊ,उद्या जाऊ असे म्हणत आजाराचे प्रमाण वाढते.
याचाच विचार करून मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा एस एम देशमुख यांच्या सूचनेनुसार सर्व जिल्हा व तालुका पत्रकार संघानी मराठी पत्रकार परिषदेच्या 82 व्या वर्धापदिनाच्या निमित्ताने किरकोळ वाटणारे परंतु शरीराची मोठी हानीकारक अनेक आजार तपासणी म्हणजेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केलेले आहे.
आपल्याकडे वेळ नसतोच,परंतु थोडा वेळात- वेळ काढून आपण स्वतः व आपल्या परिवारास या शिबिरासाठी घेऊन जावे,सहभागी व्हावे ही विंनती.
आरोग्य शिबीर फक्त आणि फक्त पत्रकार व त्यांचे कुटुंबिय यांच्यासाठी आहे. तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने व अगदी कमी वेळेत आणि मोफत तपासणी केली जाणार आहे.
.चला तर स्वतःसाठी व स्वतःच्या कुटुंबासाठी वेळ काढून या शिबिराचा फायदा घेऊ ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे यांनी कळकळीचे आवाहन केले आहे


0 Comments