ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील महू या गावात झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर आईचे नाव भिमाबाई असे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अवघे ५ वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. १९०७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या. दलित कुटुंबात जन्मले असल्या कारणाने त्यांना शालेय जीवनात अस्पृश्यतेचा सामना करावा लागला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. पुढे ते भारताच्या स्वतंत्र लढ्यात सामील झाले.
दलितांना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. १९५६ मध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला व लक्षावधी दलितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.
०६ डिसेंबर १९५६ रोजी या महामानवाने जगाचा निरोप घेतला. १९९० साली त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतासाठी त्यांनी केलेल्या महान कार्यांना कधीही विसरता येणार नाही.
०५ डिसेंबरच्या रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे सहकारी नानकचंद रट्टू यांचा निरोप घेतला जाताना बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथाची प्रस्तावना तेवढी बाहेर काढून ठेवा मी ती पुन्हा वाचणार असे त्यांनी नानकचंद रट्टू यांना सांगितले दुसऱ्यादिवशी सकाळी म्हणजे ०६डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी सविता त्यांना उठववयास गेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोणतीच हालचाल करत नसल्याचं आल्यावर डॉ. बाबासाहेब हे जग सोडून गेल्याच त्यांच्या लक्षात आले सविता आंबेडकर यांनी नानकचंद रट्टू यांना बोलावणं पाठवलं रट्टू आल्यानंतरही त्यांनाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झाल्याचं लक्षात आले रट्टू यांनी ही बातमी केंद्र सरकार मंत्र्यांना व इतरांना कळवली. थोड्याच वेळात भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू या दिल्लीमधल्या अलीपुर रस्त्यावरील घरात आले पाठोपाठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चाहतेही घराजवळ येऊ लागले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं पार्थिव मुंबईला नेहण्यासाठी विशेष विमानाची सोय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली. दुपारी एका ट्रकवर व्यासपीठ तयार करून त्यावर बाबासाहेबांच पार्थिव ठेवण्यात आले. हजारो चाहते त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी जमू लागले. त्यामुळे विमानतळावर अंत्ययात्रा पोहण्यासाठी सुमारे ०५ तास लागले. रात्री ०९:३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पार्थिव घेऊन विमान मुंबईच्या दिशेने गेले. पहाटे ०३:०० वाजता मुंबईच्या शांताकृज विमानतळावर हे विमान पोहले. आणि मुंबईत अंतदर्शनासाठी लक्षावधी चाहते जमू लागले. बाबासाहेबांचं मुंबईतल निवासस्थान म्हणजे दादरच्या हिंदू कॉलनितले राजगृह सन १९३१ ते १९३३ दरम्यान बाबासाहेबांनी ही वास्तू बांधून घेतली होती. राजगृहाच्या तळमजल्यावर बाबासाहेबांचं वास्तव्य होत. याच राजगृहावर बाबासाहेबांचं पार्थिव आणलं गेलं बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता तोपर्यंत दूरवर पसरली होती विमान तळावरही चाहत्यांची गर्दी झाली होती. आपल्या लाडक्या बाबासाहेबांचं शेवटचं दर्शन मिळावं म्हणून राज्यभरातून लाखो अनुयायी मुंबईच्या दिशेने निघाले होते. ज्या राजगृहाच्या पोर्चमध्ये बाबासाहेबांची गाडी दिमाखात फिरायची त्याठिकाणी त्यांचं पार्थिव अंतदर्शनासाठी ठेवण्यात आले ७ डिसेंबरला दुपारी ०१:४० मिनिटांनी या राजगृहातून बाबासाहेबांचा अखेरचा प्रवास सुरु झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, पोळबावाडी, परळ, एलपीस्टीन ब्रिज, सयानीरोड आणि गोखलेरोड मार्गे ही अंत्ययात्रा संध्याकाळी दादर चौपाटीजवळच्या स्मशानभूमीत पोहली सरदार पटेल यांच्या मृत्यूनंतर मुंबईने पाहिलेली ही सर्वात मोठी अंत्ययात्रा होती. सायंकाळी ०७: ५० मिनिटांनी बाबासाहेबांवर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबासाहेबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यादिवशी लाखो चाहत्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. बदन्त आनंद कौशल्यायन यांनी या सगळ्यांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. दादर चौपाटीला ज्या जागी बाबासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले तीथे नंतर एक स्तूप बांधण्यात आला. स्तूप म्हणजे चैत्य म्हणूनच आज या जागेला चैत्यभूमी म्हणून ओळखले जाते. अंत्यसंस्कारानंतर बाबासाहेबांच्या हस्ती राजगृहात आणल्या हा हस्ती कलश आजही राजगृहात आहे. बाबासाहेब आंबेडकरांची बसण्याची खोली त्यांचे ग्रंथसंपदा ते वापरत असलेल्या वस्तू विविध छड्या या राजगृहात पाहायला मिळतात. असे अनेक त्यांच्या आठवणीचे आजही दर्शन होते जणू बाबासाहेब साक्षात असल्याचे आजहि वाटते
महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन
वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी


0 Comments