Ticker

6/recent/ticker-posts

धानोरा खुर्द येथे शेतकऱ्याचा चक्काजाम या आंदोलनाचे नेतृत्व विशाल धानोरकर, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस मंगेश धानोरकर यांनी केले




 शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको आंदोलन राखी पुढाऱ्याचा बेपत्ता

मंगरुळपीर तालुक्यातील  धानोरा खुर्द  फाट्यावर .शेतकऱ्याच्या  दिल्ली येथील आंदोलनाला बळ मिळावे .केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदा केल्याच्या निषेधार्थ शेतकरयांनी ८ डिसेंबर रोजी भारत बंदचे आवाहन केले होते. या बंदला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला विविध ठिकाणी धरणे आंदोलन तर  चक्काजाम करण्यात आले .
केंद्र सरकारने केलेला नवीन कृषि कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी मंगरुळपीर तालुक्यातील 


धानोरा खुर्द येथे परिसरातील सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनाचे नेतृत्व विशाल धानोरकर, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस ,मंगेशभाऊ धानोरकर ,दिनेश चव्हाण, अमोल भाऊ धानोरकर, नूतन ताई राठोड राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हा अध्यक्ष, तसेच मसोला ,कळंबा बोडखे दत्तापूर, फाळेगाव, सनगाव, सारसिंग इत्यादी गावातील प्रतिष्ठित शेतकऱ्याच्या उपस्थित कोरोनाच्या महामारी च्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना अडचणी येऊ नये या हेतूने धानोरा फाट्यावर नारेबाजी लावून चक्काजाम करण्यात आला या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती हे आंदोलन पाहिल्यानंतर काही राजकीय पुढाऱ्यांनी फोटोसेशन केल्याचेही शेतकरी वर्गात बोलले जात आहे


Post a Comment

0 Comments