Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथे महिलांसाठी सैनिटरी पॅड डिस्पोजल मशीन चे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी केडगे .




मंगरुळपीर पोलीस स्टेशन येथे आज शुक्रवार रोजी सैनीटरी पॅड डिस्पोजल ईलेक्ट्रीक मशीन चे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांचे मार्गदर्शनात पीएसआय मंजूषा मोरे , ध्यास व जिव्हाळा बहुउददेशीय संस्थेच्या समाजसेविका अश्वीनी राम औताडे यांनी केले


पोलीस स्टेशन मंगरूळपीर च्या महिलांच्या प्रसाधन गृहामध्ये मशीन बसविण्यांत आली. सैनीटरी पॅड डिस्ट्रॉय मशीन बसविणारे महाराष्ट्र राज्यातील मंगरुळपीर पोलीस स्टेशन हे पहीले पोलीस स्टेशन असू शकते. मशीन च्या वापरा संमंधी माहीती डेमो द्वारे पंचायत समीती च्या सभागृहात देण्यांत आली . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा राजश्री यशवंत केडगे ह्या होत्या . तर प्रमूख पाहूणे पीएसआय मंजूषा मोरे , सिमा विनोद डेरे सामाजीक कार्यकर्ता यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी कामाच्या ठिकाणी असलेल्या महिलांच्या आरोग्याच्या व प्रदुर्शनाच्या दृष्टीने गरजेची असणारी सैनीटरी पॅड मशीन मंगरुळपीर ला पहील्यांदा च बघून महिलांमध्ये कुतूहलता दिसत होती .तहसिल कार्यालय , पंचायत समीती कार्यालय , एस डी पी ओ ऑफीस , पोलीस स्टेशन च्या महीला कर्मचारी सह शहरातील महिलांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार समाजसेविका अश्विनी ताई औताडे यांनी केले . ध्यास व जिव्हाळा बहुउद्देशीय संस्थे मार्फत गेल्या दोन वर्षापासुन अश्विनी ताई औताडे ह्या कार्ये करीत आहेत . याआधी त्यांनी मंगरूळपीर नगरपरिषदेच्या घंटागाडी वर सुद्धा अनोखा उपक्रम राबवून कार्य केले आहे त्यांच्या प्रयत्नाला आज यश आल्याच्या प्रतिक्रिया महीला कडून ऐकायल्या मिळाल्यात . अशा या समाजसेवी कार्य करणाऱ्या अश्विनीताई चे कौतुक केला जात आहे

Post a Comment

0 Comments