घरात शिरलेला साप
पाहून पवार कुटुंबासह गावातील मंडळीची भीतीने धांदल उडाली असताना आम्रपाली पडघान हिने घरात शिरलेल्या सापाचा लवकरच शोध घेऊन त्याला शिताफीने अगदी सहजच पकडले. तिची साप पकडण्याची कला पाहून ग्रामस्थही चकीत झाले.
मंगरुळपीर तालुक्यातील खेर्डा खु. येथे पाहुणी म्हणून आलेल्या वनरक्षक तथा सर्पमित्र युवतीने एका घरात आढळून आलेल्या पाच फुट लांबीच्या नागाला अगदी सहज पकडून जंगलात सोडत जीवदान दिले. त्यानंतर गावातील ग्रामस्थांना मार्गदर्शन करून सापाबद्दल असलेले गैरसमजही दूर केले.
मूळ वाशीम येथील रहिवासी आणि वर्धा येथे वन विभागात वनरक्षक पदावर कार्यरत आम्रपाली पडघान ही युवती मंगरुळपीर तालुक्यातील खेडां खुर्द येथे नातेवाईकांकडे आली होती. सोमवारी दुपारी गावातील नागरीक प्रेम पवार यांच्या घरात एक मोठा साप शिरल्याने कुटूंबाची भितीने गाळण उडाली. ही माहिती गावात पाहुणी म्हणून आलेल्या आम्रपाली पडघान हिला मिळताच तिने प्रेम पवार यांचे घर गाठले. घरात शिरलेला साप हा फुट लांबीचा विषारी नाग होता. तिने स्वतःकडे असलेल्या हुकच्या आधारे अगदी सहज त्या नागाला पकडले, तसेच तेथे उपस्थिताना सापाबद्दल माहिती देऊन त्यांच्या मनात सापाबद्दल असलेले गैरसमज व अंधश्रध्दा दूर केली. या घटनेची माहिती वनविभागाला देऊन तिने नागाला जंगलात सोडत जीवदान दिले. व याप्रसंगी नागरिकांना आव्हान सुद्धा करण्यात आले आपल्या परिसरातील सर्पमित्र असणाऱ्या बांधवांना फोन करून नागाला सुरक्षित ठिकाणी सोडावे नागा शेतकऱ्याचा मित्र आहे

0 Comments