वाशिम दि.१८
-जिल्ह्यात मागील काही दिवसात अतिवृष्टी झाली.अतिवृष्टीने सोयाबीन,तूर व अन्य पिकांचे नुकसान झाले.जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळावी,यासाठी प्रशासनाने शेतीच्या पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करा.असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
आज १८ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री श्री देसाई यांनी जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांचेशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची माहिती घेतली.
श्री. देसाई म्हणाले की,सोयाबीन कापणीच्या स्थितीत असतांना या पिकाला अतिवृष्टीचा फटका बसला.यासोबतच अन्य पिकांचे देखील नुकसान झाले.जिल्ह्यातील १३ महसूल मंडळात ६५ मिली. मीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याने या मंडळात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले.शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून आपण सातत्याने जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून नुकसानीची माहिती वेळोवेळी घेत असल्याचे पालकमंत्री श्री.देसाई यांनी सांगितले.
*****please visit to our Social media Platforms {DGIPRWASHIM}
*blog
http://diowashim.blogspot.com
* Instagram account
washimdio@gmail.com
*YouTube Account
Dgiprwashim
*Facebook page
@washimInfo जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
*Twiter handle
@infowashim
and also visit for dgipr news to our website www.mahanews.gov.in
*blog
http://diowashim.blogspot.com
* Instagram account
washimdio@gmail.com
*YouTube Account
Dgiprwashim
*Facebook page
@washimInfo जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
*Twiter handle
@infowashim
and also visit for dgipr news to our website www.mahanews.gov.in
0 Comments