ग्रामीण भागातही कोरोना लसि पासून वंचित न राहाव याकरिता आता स्वस्त धान्य दुकानदारांना ही जबाबदारी दिली गेली याचंच प्रत्यक्षीकरण आज शेलुबाजार येथे पहावयास मिळाले यामध्ये नागरिकांचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला
या कॅम्प ला मंगरूळपीर येथील तहसीलदार नरसीया कोंडागोरले ,उपविभागय अधिकारी राम मुळे साहेब ,अन्नपुरवठा विभागाच्या रूपालीताई सोळंके मॅडम यांनी रास्त भाव दुकानदाराचे कौतुक करत त्या म्हणाल्या की आपला मंगरूळपीर तालुका 100% लसीकरण करून पूर्ण करायचा आहे ही मोहीम अशाच प्रकारे प्रत्येकाने यशस्वी केली तर तालुक्याचे व जिल्ह्याचे उद्दिष्ट लवकरच पूर्ण होईल.
शेलूबाजार येथील
बाबाराव पवार यांचे रास्त भाव धान्य दुकान येथे कोरोना लसीकरन कार्यक्रम आयोजित केला होता त्या मध्ये शेलूबाजार येथील एकुन 177 लोकांना कोव्हिडशिल्ड व कोह्याक्सीन लस घेण्यात आली शेलूबाजार येथील रास्त भाव दुकानदार डिलर बाबाराव पवार ,प्राथमिक आरोग्या विभागाचे कर्मचारी ,आशा सेविका ,अंगनवाडी सेविका,अंगनवाडी मदतनिस,जि.प.शाळेचे शिक्षक व ग्रामपंचायत कर्मचारी यांची उपस्थिती होती





0 Comments