वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील चिखली झोलेबाबा सभागृह येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने 12 नोव्हेंबर रोजी आझादी का अमृत महोत्सवानिमीत्ताने कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न झाले. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून मान्यवरांचा शाल श्रीफळ व मोमेंटो देऊन सन्मान करण्यात आला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय न्यायाधीश श्रीमती शैलजा सावंत मॅडम होत्या, प्रमुख अतिथी म्हणून एस पी शिंदे साहेब सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वाशिम , एन के मेश्राम साहेब दिवानी न्यायाधीश व अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती मंगरूळपीर, राम मुळे साहेब उपविभागीय अधिकारी मंगरूळपीर , तहसीलदार नरसीया कोंडागोरले साहेब मंगरूळपी, पी आर बंग मंगरूळपीर तालुका वकील संघाचे अध्यक्ष , सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ व स्तर वाशिम एस व्ही फुलबांधे मॅडम, मुख्य न्यायदंडाधिकारी वाशिम आर पि कुलकर्णी साहेब , सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर मंगरुळपिर आर एस मानकर साहेब
यांची उपस्थिती होती.
मान्यवरांनी कायद्यातील तरतुदीविषयी माहिती दिली.तसेच इतर विविध कायद्यांबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
या वेळी ॲड ढेंगाळे , ठाकरे, पांडे, सरकाले, राठी, मुळे, इंगोले, खडसे, शृंगारे, भगत , ह्यांनी कार्य क्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. विधीज्ञ मंडळ मंगरूळ पीर चे संपूर्ण सदस्य उपस्थित होते.
. यावेळी चिखली येथील सरपंच,उपसरपंच, अंगणवाडी सेविका,आशा ,ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित ग्रामस्थांना कायदेविषयक पत्रकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
एस पी शिंदे ,
सूत्रसंचालन ॲड पी एल वैरागडे यांनी केले. आभार प्रदर्शन एन के मेश्राम यांनी मानले. मंगरुळपीर तालुक्यातील चिखली येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न
विभागीय सेवांचे स्टॉल लावण्यात आले होते यामध्ये सहभागी झालेले महसूल विभाग, जिल्हा माहिती कार्यालय ,पोस्ट खाते, कृषी विभाग ,आरोग्य विभाग ,वीज वितरण महामंडळ ,पंचायत समिती, व काही समूहाच्या महिलांनी सुद्धा सहभाग घेतला होता या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली










0 Comments