नागपुर ◆
कुलदेवी आशापुरा माताजीं च्या कृपेने
कोंढाळी येथील गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे , वैद्यकीय क्षेत्रात जनसामान्यांची सेवा करणारे व्यापारी क्षेत्रात एक आगळावेगळा इतिहास निर्माण करणारे टावरी परिवाराच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
सौ दीपिका योगेशकुमार टावरी व सौ प्रेमा किशोर चांडक
परिवाराच्या ,
चातुर्मास उद्यापण, तुळशी विवाह मंगळवार 16/11/2021 सायंकाळी 5 वाजता. श्री राम मंदिरापासून प्रस्थान करण्यात आले होते जणू काही भगवान परमात्म्याच्या लग्न सोहळ्यात उपस्थित असल्याचा आनंदही यावेळी प्राप्त झाला होता याप्रसंगी चातुर्मास उद्यापन पूर्णहोती बुधवार 17/11/2021 रोजी पार पडली
56 भोग चा प्रसाद याप्रसंगी सर्व मान्यवरांना घेण्याचा आनंद ही मिळाला
आणि
श्रीमती.शांताबाई टावरी यांचे तुलादान नमन सभागृह काटोल रोड कोंढाळी येथे आयोजन करण्यात आले होते तुलादान, 12 वाजता करण्यात आले नमन सभागृह काटोल रोड इथे नातेवाईक सर्व मित्र परिवाराचा या कार्यक्रमात सहभागी झाले होते या कार्यक्रमात मी सुद्धा माझ्या परिवारासह उपस्थित होतो.टावरी परिवारातील पितृतुल्य
डॉक्टर भागचंदजी टावरी, डॉक्टर संजयकुमारजी टावरी
यांच्या आशीर्वादाने,
योगेशकुमार किसनलालजी टावरी, सौ दीपिका योगेश कुमार टावरी , डॉक्टर महेशकुमार किसनलालजी टावरी , डॉक्टर सौ शिल्पा महेशकुमार टावरी,
सौ अंजली कन्हैयालाल मंत्री यांच्या मातोश्री श्रीमती.शांताबाई टावरी यांचे सर्व परिवाराच्या साक्षीने तुला दान करण्यात आले . शांताबाई यांचे नातू निकुंज योगेशकुमार टावरी , तनिष महेशकुमार टावरी
शांताबाई यांचे भाऊ ,नारायणदाशजी , अशोककुमारजी, दिलीप कुमारजी तळेगाव निवासी या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते
तुलादानाच्या लाभाबाबत आमचे गुरुजी सांगतात की, या दानाने सर्व ग्रहांचे दान केल्याचे पुण्य मिळते. वास्तविक, आपल्या शरीराच्या प्रत्येक भागावर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचे राज्य असते. तुलादान केल्याने सर्व ग्रहांचे दान केले जाते, ज्यामुळे तुमच्यावर असलेले सर्व ग्रहांचे दोष दूर होतात. असे केल्याने आरोग्य लाभ आणि आनंद आणि समृद्धी आपल्याला प्राप्त होते .पुराणात तुलादानाला महादान म्हटले आहे आणि त्यामुळे मानवी जीवनात आलेल्यांना
विष्णुलोकाची प्राप्ती होते असे . पौराणिक काळात श्रीमंत लोक सोन्याचे पैसे दान करत असत. पण आता लोक धान्य आणि नाणी देऊन अन्नदान हि करून या गोष्टीची प्राप्ती करून घेता येते. पौराणिक कथेनुसार, प्रयाग येथे भगवान विष्णूच्या आज्ञेनुसार ब्रह्मदेवाने तीर्थक्षेत्रांचे महत्त्व ठरवण्यासाठी तुला राशीचे दान केले होते. यामध्ये सर्व देवस्थान एका बाजूला आणि प्रयाग दुसऱ्या बाजूला तुला ठेवण्यात आले होते. सर्व तीर्थक्षेत्रे मिळूनही प्रयागची बरोबरी होऊ शकत नाही. तेव्हापासून प्रयागला तीर्थराज म्हणून ओळखले जाऊ लागले.
या आख्यायिकेमुळे प्रयाग आणि इतर अनेक तीर्थक्षेत्रांमध्येही तुला दान करण्याची परंपरा आहे.भगवान श्रीकृष्णाच्या लीलांपैकी एक तुलदान लीला आहे ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णाने तुळशीचे महत्त्व सांगितले आहे. या लीलेच्या प्रेरणेने, भगवान द्वारकाधीश मंदिरासह, दुसरे मंदिर बांधले गेले आहे जे तुलादान मंदिर म्हणून ओळखले जाते.
आई आणि वडिलांची तुला दान केल्याने या सर्व गोष्टींचा लाभ होतो . म्हणून तर संतांनी म्हटले आहे , कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी का वाटे देवा. अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे निश्चितच मानवी मनावर लालची धूर पडणार नाही कारण अशा प्रकारचे उत्सव केल्याने मानवी मनातील विकल्प याला आळा बसेल या कार्यक्रमात काही
मान्यवरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यावर या कार्यक्रमाचे महत्त्व कळले हा बातमीचा विषय नसून या कार्यक्रमाला मी स्वतः उपस्थित असल्यामुळे जो मी आनंद अनुभवला तोच अनुभव आपल्या सर्वांना अनुभवता यावा या उद्देशाने हे शब्दांकन केले आहे वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी














0 Comments