अकोला - ◆
अंकुर साहित्य संघाचा दिवाळी अंक दीपांकुर चा प्रकाशन सोहळा नुकताच दिः २ नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. स्थानिक जानोरकर मंगल कार्यालय,रिंग रोड येथील सभागृहात जेष्ठ साहित्यिकाच्या उपस्थितीत आणि साहित्य रसिकांच्या साक्षीने दीपांकुर या दिवाळी अंकाचे सुप्रसिद्ध साहित्यिक,समीक्षक डॉ. सतीशजी तराळ यांचे हस्ते थाटात संपन्न झाले.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अंकुरचे माजी केंद्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोदजी काकडे, विशेष उपस्थिती म्हणून श्रीमती रेखाताई शेकोकार, केंद्रीय कार्याध्यक्ष श्री. तुळशीरामजी बोबडे, नाशिक येथील कवी नंदकिशोर ठोंबरे, श्री. विक्रमजी जानोरकर, प्राचार्य श्री. दाभाडे सर उपस्थित होते.
डॉ. सतीशजी तराळ यांनी आपल्या उदघाटनीय भाषणातून अंकुर साहित्य संघाचा हा पस्तीसावा दिवाळी अंक दीपांकुर नव्या रूपात आलेला आहे. हा दिपांकुर म्हणजे दिव्यांकुर ठरू शकणार आहे.१९८६ साली स्व.हिम्मतराव शेकोकार यांनी स्थापन केलेल्या अंकुरचा आज वटवृक्ष झालेला आहे. महाराष्ट्राबाहेर गोवा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेशातही अंकुरचे कार्य सुरू आहे. आजपर्यंत ५८ साहित्य संमेलने पार पाडली असून नवोदितांना हक्काचे व्यासपीठ देण्याचे कार्य करीत आहे. कोरोना काळातही आँनलाईन कार्यक्रम घेऊन आपली साहित्यिक चळवळ सुरू ठेवली, यामध्ये केंद्रीय अध्यक्ष हिम्मतराव ढाळे, केंद्रीय सचिव प्रा. संजय कावरे आणि त्याची संपूर्ण टीम काम करीत होती, बहुजनांच्या साहित्य, संस्कृती संवर्धनात अंकुरची भुमिका मोठी आहे,असे गौरोद्गार त्यांनी
काढले.अंकुरचे कार्याध्यक्ष श्री. तुळशीरामजी बोबडे यांनी नव्या रूपात आलेल्या दीपांकुरचे आणि त्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व टीमचे भरभरून कौतुक केले.*
*कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रमोदजी काकडे म्हणाले की, अंकुरने आज कात टाकली आहे. नव्या दमाने काम करणारी टीम अंकुरजवळ आहे, ही जमेची बाजू आहे. अंकुरची पताका अशीच निरंतर फडकत राहील, याची खात्री आहे. नव्या कल्पना,नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी उत्साह, असेल तरच नाविन्यपूर्ण कार्य घडून येते. असे उत्साही विचार आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. या प्रकाशन सोहळ्यासाठी लक्ष्मण दारमोडे( व-हाडी कट्टा) श्यामभाऊ ठक ( व-हाडी मंच ) संदीप देशमुख ( तरूणाई फाउंडेशन ) कवी विचार मंच, इ. साहित्य चळवळीतील साहित्यिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. हिम्मतराव ढाळे, प्रा. संजय कावरे शिवलिंग काटेकर, वासुदेवराव खोपडे सुरेशजी लांडे, योगशिक्षक अवचार सर प्रशांत भोंडे, धीरज चावरे, राजाभाऊ देशमुख, प्रा. मोहन काळे, विद्याताई बनाफर,सुरेश लांडे,गोपाल मापारी यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमात पंकज कांबळे डाँ. मनोहर घुगे, गोपाल मापारी, अमोल गोंडचवर, कु.कोमल प्रांजळे मुखपृष्ठ दीपांकुर, गजानन काळे, प्रवीण हटकर, रमेशचंद्र धीरे बाबूजी, गजानन प्रमोद खरडे प्रभाकर दिवनाले धीरज भोंडे प्रा सदाशिव शेळके रविंद्र महल्ले राजू चिमनकर उमाताई गवई संतोष भाकरे सुमेध वानखडे दिपाली माथने दिगंबर पवार कृष्णराव घाडगे मारोती नागोसे प्रशांत वरईकर रंजन तायडे सतिष वानखडे संजय गावंडे बाळासाहेब सोळंके नीता आसवले विनोद देशमुख हेमंत पदमने गोपीचंद ढिगोळे उज्वला कांबळे या बरोबरच शहरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन केंद्रीय सचिव प्रा. संजय कावरे यांनी केले तर आभार धीरज चावरे यांनी मानले.




0 Comments