Ticker

6/recent/ticker-posts

शेतकरी बांधवांच्या विज बिल समस्या साठी राम ठाकरे झाले आक्रमक

 



मंगरुळपीर तालुक्यात कासोळा,दस्तापुर,पोटी,आसेगाव,धानोरा व ईतर खेड्यातील  शेतकरी बांधवांना महावितरन कंपनीचे देयके अव्वा सव्वा पध्दतीने आल्यामुळे व संध्या लाईन सदर्भात समस्या असल्यामुळे  शेकडो शेतकरी बांधव  सामाजिक कार्यकर्ते रामदादा ठाकरे यांनी थेट महावितरनच्या कार्यालयात जाऊन शेतकर्‍यांच्या समस्या   मांडल्याय महावितरणचे अधिकारी जांभुळकर यांच्याशी  संवाद करत सदर शेतकऱ्यांच्या असलेल्या समस्या त्यांच्यासमोर  बिलासदर्भात पर्याय काढा व एक इंस्टॉलमेंट भरल्यावर कुठल्याही शेतकऱ्याची लाईन कापू नका  निसर्गाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले सोयाबीन पिकाने आधीच पावसामुळे मोठे  शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे पाहिजे तसा सोयाबिनला भाव नाही,सोयाबिन पिकही अपेक्षेप्रमाने झाले नाही अशा या बिकट परीस्थीतीत शेतकरी  महावितरन कंपणीचे विद्युत बिल भरने शक्य नसल्या कारनाने शेतकरी वर्ग बिल कसे भरणार शेतकरी  त्यामध्ये काही सूट देऊन किंवा काही मार्ग काढून शेतकरी बांधवांच्या लाईन सुरू कराव्या अशी मागणी लावुन धरुन तोडगा काढावा सदर शेतकऱ्यांची बाजू ऐकून व राम ठाकरे यांच्या निवेदनाचा विचार करुन महाविरनचे जांभुळकर  यांनी शेतकऱ्यांना वीज बिल तर भरावे लागेल ते टळनार नाही मात्र शेतकर्‍यांप्रती पुर्ण सहानुभुती ठेवुन सदर शेतककरी  विज बिल हे तिन टप्यात भरावे अशी विनंतीही केली  विज बिल भरना सदर्भातला हा पर्याय अनेक शेतकर्‍यांनी मान्य ही केला व राम ठाकरे यांच्या मागणीला यश ही आले


ठाकरे यांनी शेतकरी  व्यवस्थीत समजावुन सांगीतले की आपल्या महावितरनला सहकार्य करावेच लागेल असे प्रतीपादन करुन शेतकर्‍यांचे  समाधान केले या पर्यायामुळे अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व्यक्त झाले मात्र काही शेतकऱ्यांना कमी तर काही शेतकऱ्यांना जास्त बिल असल्यामुळे नाराजीचा सुर ही उमटत होता अनेक शेतकरी या वीज बिला मुळे त्रस्त आहेत त्यामध्येच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये डीपीची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार लाईन नादुरुस्त असल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे महावितरण डीपी दुरुस्त करून तसेच लाईनचे शेड्युल व्यवस्थित करून शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य करावे अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही राम ठाकरे यांनी यावेळी दिलाय यावेळी शेकडोंच्या संख्येत शेतकरी  सामाजिक कार्यकर्ते राम ठाकरे सोबत होते साहेब शेतकऱ्याचा अंत आता पाहू नका कोरोना महामारी मुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आणखी त्रास देऊ नका वीज तोडीचे कार्य थांबवा


Post a Comment

0 Comments