मंगरूळनाथ येथे कोविड मुळे विधवा झालेल्या महिलांना साडी व फराळ देऊन भाऊबीज साजरी केली. या कार्यक्रमाचे आयोजन ध्यास व जिव्हाळा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. अश्विनी औताडे यांनी केले होते.
यासाठी त्यांना माऊली पॅथॉलॉजी चे संचालक डॉ. श्रीहरी पाबळे, राम फार्मा चे संचालक राम खूपसरे, मारुती जटाळे तसेच सचिन पोहेकर व स्वानंद पाबळे यांचे सहकार्य लाभले. विधवा
महिलांना यांच्या सहकार्यातून साडी-चोळी व दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.कोरोना मुळे लोक खूप आर्थिक संकटात सापडले आहेत त्यामध्ये पण ज्या महिला कोरोना मध्ये विधवा झाल्या त्यांची परिस्थिती खूपच खराब आहे. शासनाने मदत जाहीर करून पण आतापर्यंत त्यांना मदत भेटली नाही.
या पार्श्वभूमीवर विधवा महिलांसाठी अश्विनीताई नी भाऊबीज कार्यक्रमाचे हे आयोजन केले होते. उपस्थित महिला. सुनंदा पांडुरंग चोपडे, सूर्यकांता रामदास मुळे, उषा किरण मनोहर





0 Comments