Ticker

6/recent/ticker-posts

आदिवासी समाजाला प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घेणार: आ. अ‍ॅड. सरनाईक


बिरसा मुंडा चषक कबड्डी स्पर्धेला भेट
वाशीम : जिल्हयातील मौजे रामगाव (मोतसावंगा) या आदिवासी गावात क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या 146 व्या जयंती निमीत्त आयोजित बिरसा मुंडा चषक कबड्डी स्पर्धेला अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार तथा आदिवासी जनकल्याण समिती महाराष्ट्र शासनाचे सदस्य अ‍ॅड. किरणराव सरनाईक व राज्य शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त निलेश सोमाणी, प्रा. राठोड यांनी भेट देवून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले.  
    मौजे रामगाव येथे आयोजित कबड्डी स्पर्धेत सर्वप्रथम क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पण करण्यात आले. तद्नंतर आ. अ‍ॅड. सरनाईक व सोमाणी यांनी सर्व कबड्डी स्पर्धकांचे हस्तांदोलन करून त्यांचा परिचय करून घेतला. यावेळी बिरसा मुंडा ग्रुप व एकलव्य ग्रुप यांच्यामध्ये कबड्डी सामना रंगला. सदर कार्यक्रमाला मंचावर आर.बी.मोरे, नारायण डाखोरे, नाजुकराव भोंडने, हनुमान ठाकरे, बाबाराव साखरे, संदीप डाखोरे, महादेवराव साखरे, पंडीत पाखरे, आनंदराव खुळे, गोविंदराव भोंडणे, हनुमान झाटे, नामदेवराव भोंडणे, पि.बी. मोरे, आर.बी. मोरे, वाघमारे, श्याम गोदमले, गजानन कुरकुळे, सुनिल वैद्य, कु.पूर्वा सोमाणी समवेत मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्याहस्ते आ. सरनाईक व सोमाणी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ. सरनाईक यांनी मागदर्शन करतांना सांगीतले की, आदिवासी समाज हा जिद्दी व परिश्रम करणारा आहे. समाजामध्ये शिक्षणाचा अभाव असल्याने विकासापासून वंचित आहे. आज केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अनेक योजना आदिवासी समाज बांधवांकरीता राबविण्यात येत आहेत. समाजातील युवकांनी व्यसनापासून दूर राहून शिक्षणाला महत्व द्यावे, शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. सोबतच आदिवासी समाज बांधवांना प्रवाहात आणण्यासाठी आपण पुढाकार घेणार असून शासनाच्या समितीच्या माध्यमातून खर्‍या आदिवासी बांधवांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी तरूण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमात अ‍ॅड. सरनाईक व सोमाणी यांच्याहस्ते पुरस्काराचे वितरणही करण्यात आले.  



Post a Comment

0 Comments