Ticker

6/recent/ticker-posts

दीनदुबळ्यांसह कष्टाळूंची दिपावलीच्या आनंदाची साथ संगत झाली गोड - : वस्त्र विविध सामुग्री भेट


 【 काशिनाथ कोकाटे रिसोड प्रतिनिधी

रिसोड  शहरात साहानुभूतीची भिंत पत्रकार प्रेरणादायी कट्ट्यावर मानवता प्रतिष्ठान सामाजिक संघटना,पत्रकार बांधव व प्रतिष्ठित नागरिक संकल्प  विविध सामाजिक संघटनांसह संस्थांनी दीपोत्सवात दीनदुबळ्यांसह कष्टकऱ्यांना नवीन वस्त्रे फराळ  वाटप केला. दिवाळीत सगळीकडे धामधूम असताना वंचितांनाही या सणाचा गोडवा चाखता यावा, यासाठी तालुक्यातील 




दीनदुबळ्यांसह कष्टाळूं यांना 
भेट  हाती पडताच त्यांचे डोळे पाणावले होते. हा उपक्रम अनुकरणीय असल्याचे मत तहसीलदार अजित शेलार  ठाणेदार एस, नवलकार  यांनी व्यक्त केले. यावेळी तहसीलदार अजित शेलार, मोहनराव देशमुख,उपाध्यक्ष जिल्हा पत्रकार संघ,पी डी पाटील ता अध्यक्ष पत्रकार संघ,रवि अंभोरे जिल्हाध्यक्ष मानवता


 प्रतिष्ठान,गजानन बानोरे,संतोष गणेश देगावकर प्रमोद गरकळ अमित पाटील  प्राध्यापक राजेंद्र चाटसे  खडसे  वाघमारे,रणजित ठाकूर ताराचंद वर्मा,काशीनाथ कोकाटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. होते.गेल्या सात वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्रा.रवि अंभोरे जिल्हाध्यक्ष मानवता प्रतिष्ठान यांनी सांगितले. 


सूत्रसंचालन काशिनाथ कोकाटे तर आभार गजानन बानोरे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments