Ticker

6/recent/ticker-posts

जमावास एकत्र जमण्यास मनाई28 डिसेंबर ते 11 जानेवारी दरम्यान कलम 37 लागू




वाशिम, 

 : जिल्हयात सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर पाच किंवा त्यापैकी अधिक व्यक्तींच्या जमावास एकत्र जमण्यास किंवा मिरवणूकीस 28 डिसेंबर 2021 ते 11 जानेवारी 2022 दरम्यान मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) चे मनाई आदेश लागू राहील. जिल्हयामध्ये कोविड- 19 प्रतिबंधक उपाययोजनेच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या बाबींचे पालन करुन हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय/निमशासकीय कर्मचारी किंवा विवाह, अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस व कार्यक्रमास हे आदेश लागू राहणार नाही.

Post a Comment

0 Comments