स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत सर्व गावे हागणदारीमुक्त करण्याचे मोदी सरकारचे ध्येय आहे. मात्र प्रशासनातील उदासिनता आणि ग्रामीण भागातील लोकांच्या सवयी यामुळे आजही आपल्या देशामधील हातावर मोजण्या इतकेच गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. शासन शौचालय बांधण्यासाठी अनुदान देते. तरीही अजूनही ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाहीये.
असे म्हणतात ना की, गावातील काही लोकांनी जर एखादी चांगली गोष्ट करायची ठरवल्यावर ते काहीही करू शकतात. याचाच एक अनुभव वाशिम जिल्हातील करंजी येथे आला. ग्रामपंचायतने मागील 4 महिन्यापासून ग्रामस्थांना वारंवार उघड्यावर शाैचास जाऊ नका अशा सूचना दिल्या, नोटीस दिल्या तरीही गावातील काही लोक ऐकायला तयार नव्हते आणि ते उघड्यावरच शौचास जात होते. यामुळे गावातील सर्वच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.
याला आळा घालण्यासाठी करंजी ग्रामपंचायतचे गोपाल पाटील लहाने यांनी अफलातून शक्कल लढवत चक्क लोक ज्याठिकाणी शौचास जात होते तिथे सी.सी.टी. व्ही. कॅमेरेच बसवले. प्रायोगिक तत्त्वावर जिल्हा परिषद शाळेसमोर आणि आरोग्य उपकेंद्रासमोर 2 सी.सी.टी. कॅमेरे बसवले आणि याची माहीती संपूर्ण गावाला दिली. सरपंच इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी लोकांना सांगितले की, जे उघड्यावर शौचास बसेल त्याची माहीती मला मोबाईलवर मिळेल.
ग्रामपंचायतच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही
जो व्यक्ती उघड्यावर शौचास बसेल त्याला घाण साफ करण्यासोबतच ग्रामपंचायतच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. त्या व्यक्तीला दंड आकारून त्याचे नाव ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवर लिहण्यात येणार आहे. एक लाख रुपये खर्च करून 2 कॅमेरे सध्या गावामध्ये बसवण्यात आले आहेत. असून उर्वरीत 8 कॅमेरे गावात ज्या ठिकाणी घाण होते त्या ठिकाणी बसविण्यात येणार असल्याचे सरपंच गोपाल पाटील लहाने यांनी सांगितले आहे. मात्र, या अफलातून उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


0 Comments