मंगरूळपीर नगरपरिषद हद्दीतील अशोक नगर ते. संतोषी माता मंदिर.पर्यंत ही दलित वस्ती आहे दलित वस्तीतील नागरिकांना पाणीपुरवठा नागरिकांच्या सोयीनुसार मिळण्याकरिता याच दलित वस्ती करिता शासनाने एक स्पेशल नवीन पाण्याची टाकी दिली आहे त्या टाकीवरून मंगरूळपीर शहरात नगर परिषद हद्दीतील पूर्ण दलित वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा केला जातो व तसेच दलित वस्तीत स्पेशल पाईप लाईन गेली आहे परंतु तीच पाईपलाईन एका नगरसेवकाने सुवर्ण वस्तीकडे वळवली आहे त्यामुळे दलित वस्तीत पाणी मिळणे कठीण झाले आहे आठ-आठ दिवस दलित वस्ती मध्ये नळ येण्याची वाट बघावी लागते ही पाईपलाईन सुवर्ण वस्तीकडे घेऊन जाऊ नये यासाठी एका नगरसेवकाने अतोनात प्रयत्न केले होते परंतु त्याच्या प्रयत्नाला यश आले नाही दलित वस्तीत दलिताच्या मतावर निवडून आलेल्या नगरसेवकाने मात्र ही पाईपलाईन सुवर्ण वस्तीकडे वळवण्यासाठी संमती दिली ही एक लाजिरवाणी बाब आहे ज्या दलितांच्या मतावर नगरसेवक निवडून येतात त्यानेच दलितांच्या तोंडाचे पाणी हिसकावले आहे याबाबत काही सुज्ञ दलित वस्ती मध्ये सविस्तर चर्चा केली असता मिळालेल्या माहितीनुसार याच महिन्यात नगर परिषद बरखास्त होणार आहे सर्व निष्क्रिय नगरसेवक घरी जाणार आहेत आता मात्र त्यांनी राजकारण सोडून जावे किंवा विसरून जावे आगामी निवडणुकीत आम्ही जनसेवक असलेल्या नवोदित सक्रिय उमेदवाराला निवडून देऊ असा एकमुखी निर्णय घेतला आहे सुज्ञ दलितांच्या वरील बोलण्यावरून असे वाटते की दलित वस्तीची पाईप लाईन सुवर्ण वस्तीकडे वाढविणारा तो नगरसेवक व दलितांच्या मतावर निवडून येऊन दलित वस्ती ची पाईपलाईन सुवर्ण वस्तीकडे वळविण्यासाठी संमति देणारे तो निष्क्रिय नगरसेवक यांना मात्र आगामी निवडणुकीत पराभव होणार आहे यात कुठलीही तीळभरही शंका नाही 1998 पासून अस्तित्वात असलेली दलित वस्ती शासनाच्या अनेक योजना पासून व विकासापासून कोसो दूर
0 Comments