Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात आग आपत्ती नियंत्रण व बचाव व्यवस्थापन आणी पुर्व सज्जतेसाठी प्रात्यक्षिके व मार्गदर्शन

 


 वाशिम जिल्हाधिकारी माननीय  शण्मुगराजन एस.सर यांच्या आदेशाने निवासी जिल्हाधिकारी माननीय  शैलेश हींगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली  दि.10 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 4:30 वाजता आग प्रतिबंधक व्यवस्थापन आणी आग नियंत्रण व्यवस्थापन व पुर्व सज्जता आणी बचाव व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन देऊन आग विझविण्यासाठी करावयाची कार्यवाही कार्यक्रम वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला या कार्यक्रमाला कार्यालयातील सर्व अधिकारी आणी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी अग्निशमन अधिकारी आदीवाल साहेब यांच्या नेतृत्वात  अग्निशमन दलाची टीम अग्निशमन वाहनासह उपस्थित होती.


मार्गदर्शक मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन पिंजर जिल्हा अकोला चे संस्थापक दिपक सदाफळे (जिवरक्षक ),वाशिम न.प.अग्निशमन अधिकारी आदीवाल साहेब, आणी अली बंदुकवाला अकोला यांनी मार्गदर्शन केले यामध्ये basic fire disaster control activity & Rescue operation management. 


आग प्रतिबंधक व्यवस्थापन आणी आग विझविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व अग्निशमन यंत्राचे प्रकार आणी ओळख व त्याला हातळण्याची कार्यपद्धती वर योग्य मार्गदर्शन केले.


या कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहु भगत साहेब यांनी केले.प्रमुख उपस्थिती मध्ये जिल्हाधिकारी साहेबांचे स्वि.सहा.धर्मराज चव्हाण साहेब,राहुल वानखडे साहेब अधिक्षक जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम,सहाय्यक अधिक्षक कैलास देवळे साहेब, सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार,हे हजर होते अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहु भगत साहेब यांनी दीली आहे.




Post a Comment

0 Comments