मंगरूळपीर-यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयात गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळाची सत्र 2021- 22 या वर्षाकरिता नूतन कार्यकारिणी दि. 8 डिसेंबर 2021 सोमवार गठित करण्यात आली.
नूतन कार्यकारी प्राचार्य डॉ. कान्हेरकर सर यांच्या मार्गदर्शनात प्रा. सौ .एस. एस . जाजू यांनी गठीत केली .याप्रसंगी समन्वयक यांनी अभ्यास मंडळाचे उद्देश आपल्या मनोगतात स्पष्ट केले व कार्यक्रमाला सुरुवात झाली .
याप्रसंगी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष पदी बी.ए. भाग 3 च्या सोनल साखरकर तर सचिवपदी वैष्णवी चौधरी यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष मोहना पंडित, सहसचिव पूजा सोळंके, कोषाध्यक्ष साक्षी ढोले, सहकोषाध्यक्ष ईश्वरी चौधरी, सल्लागार भाग्यश्री राऊत, प्रसिद्धीप्रमुख प्रिया शिंदे ,सह प्रसिद्धीप्रमुख अंजली मनवर यांची अविरोध निवड करण्यात आली.
तर सदस्यपदी सानिका आखाडे, प्रज्ञा चुंबळे ,प्रलय घोडे ,राणी जामनिक, अंजली बोंबले, प्रिया राऊत ,किरणा आटपटकर ,ललिता निंबेकर, प्रगती पाकधने , नीतादेवळे, भारती इंगोले, प्रियंका ठाकरे, स्नेहल वाडेकर, आचल इंगळे, कल्याणी गावंडे, प्रियंका गावंडे, साक्षी ठाकरे, दीक्षा सोनवणे, निकिता म्हात्रे मध्ये इत्यादींची निवड करण्यात आली.
प्रस्ताविक सोनल साखरकर, मनोगत मोहना पंडित, वैष्णवी चौधरी यांनी केले तर संचालन साक्षी ढोले आभार प्रदर्शन प्रिया शिंदे यांनी मानले. सर्व कार्यकारिणी सदस्य यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक विद्यार्थी उपस्थित होते व कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला.
प्रा. सुषमा जाजू
समन्वयक
गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळ
य. च .कला व विज्ञान महाविद्यालय मंगरूळपिर, जिल्हा- वाशिम

0 Comments