Ticker

6/recent/ticker-posts

य. च. महाविद्यालयात गृहअर्थशास्त्र विभागात गटचर्चा संपन्न



मंगरूळपीर-
स्थानिक श्री मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ , कासोळा द्वारा संचलित यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयात संस्थेचे सचिव मा. चंद्रकांत दादा ठाकरे, प्राचार्य डॉ. सूर्यकांत कान्हेरकर व गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सुषमा जाजू यांच्या मार्गदर्शनाखाली 


दिनांक 20 ते 22 डिसेंबर 2021 सतत तीन दिवस गटचर्चा चे आयोजन केले. त्यात सर्वप्रथम समन्वयक प्रा. सौ .जाजू यांनी गटचर्चेचे उद्दिष्टे आपल्या प्रास्ताविकामध्ये स्पष्ट केले. या गटचर्चे मध्ये मानवी जीवनात पुष्परचना व बुकेचे महत्त्व ,आहारातील फळांचे व भाज्यांचे महत्त्व,


 बालकाच्या जीवनात शिस्तीचे महत्व, मातेचे दूध बालकांच्या दृष्टीने नैसर्गिक अन्न अशा विविध विषयांवर गटचर्चा करण्यात आली .या गटाचे मध्ये 13 गटांनी सहभाग नोंदविला. प्रत्येक विषयावर सखोल सविस्तर चर्चा जाहिरात, मुलाखत, नाटकाच्या स्वरूपामध्ये प्रस्तुत केले.
यामध्ये बी.ए. भाग 1 चे ललित निंबेकर, पूजा सोळुंके, ईश्वरी चौधरी, सानिका आखाडे, सुष्मिता गेंड,रेणुका मोरे, किरण आटपाडकर, शरयू इंगोले, मोहिनी मनवर ,मायावती मनवर, सुप्रिया भगत, प्रिया राऊत ,अंजली बोंबले, प्रज्ञा चुंबळे इत्यादी तर बी.ए. भाग 2 चे मोहना पंडित, प्राची भड, रेणु गोरटे, रेश्मा गारवे ,गायत्री खोडे, वैष्णवी अंभोरे, मयुरी कांबळे ,शितल सुर्वे ,वैष्णवी घोडे ,प्रगती  पाकधने इत्यादी तर बी. ए. 3 चे स्नेहल वाडेकर, प्रियंका ठाकरे, सोनल साखरकर ,दीक्षा सोनवणे ,वैष्णवी चौधरी, कल्याणी गावंडे ,साक्षी ठाकरे, प्रिया शिंदे ,शुभांगी राऊत, भाग्यश्री राऊत इत्यादी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. त्यात प्रथम क्रमांक जिजामाता ग्रुप तर द्वितीय क्रमांक आपले आरोग्य आपले जीवन या ग्रुप तर तृतीय क्रमांक सखी सह्याद्री या ग्रुपचे आले.


 या गटचर्चेचे   सूत्रसंचालन साक्षी ढोले यांनी तर आभार प्रदर्शन भाग्यश्री राऊत यांनी मानले या गटचर्चेमध्ये  बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते व गटचर्चा यशस्वी संपन्न झाली.
प्रा. सौ. एस. एस. जाजू
समन्वयक
गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळ
य .च .कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरूळपिर

Post a Comment

0 Comments