मंगरूळपीर-मो. ठा. शि. प्र. मं. कासोळा द्वारा संचालित स्थानिक यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय मंगरूळपीर येथील गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळ अंतर्गत संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाष रावजी ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त बस स्टॅन्ड मागे झोपडपट्टीतील लहान मुलांना नवीन हाताने शिवलेले कपडे आणि बिस्कीट वाटपाचा कार्यक्रम दिनांक 09- 12 -2019 गुरुवार रोजी संपन्न झाला.
मानव हा सामाजिक प्राणी आहे व समाजात वावरत असताना आपल्याला समाजाचे काही ना काही प्रमाणात ऋण फेडण्याची संधी म्हणजे फूल नाही फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजातल्या उच्च, निम्न, धनवान, दारिद्र्य अशा भेदभाव मधली दरी कमी करण्याकरिता असे उपक्रम साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्वभाव गुणाला अनुसरून राबविण्यात आले ,असे मत गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळ समन्वयक प्रा .एस. एस. जाजू यांनी यावेळी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री बबन भोयर ,श्री राजू आवारे ,श्री कैलास चव्हाण हे होते, अध्यक्ष सोनल साखरकर गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळ अध्यक्ष हे होते. यामध्ये बी.ए. भाग 3 चे सर्व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला तसेच या कार्यक्रमाचे 35 लाभार्थींनी लाभ घेतला. हा कार्यक्रम संस्थेचे सचिव मा. श्री. चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन प्राचार्य डॉ. कान्हेरकर सर यांच्या मार्गदर्शनात प्रा सौ. एस. एस. जाजू यांनी आयोजित केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिक्षा सोनोने यांनी तर आभार प्रदर्शन शुभांगी राऊत यांनी केले व कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला.




0 Comments