वाशिम ◆
जिल्ह्यातील सर्व सहाही तालुक्यात कोविड लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे.ओमीक्रोन या नव्या विषाणूचा धोका निर्माण झाला असताना नागरिक आता कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सरसावले आहे.जिल्ह्यात आज 9 डिसेंबर रोजी 5 हजार 121 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये पहिला डोस 2 हजार 125 व्यक्तींनी व दुसरा डोस 2 हजार 996 व्यक्तींनी घेतला.
वाशिम तालुका : पहिला डोस - 487 व दुसरा डोस -911 असा एकूण 1398, मालेगाव तालुका : पहिला डोस - 578 आणि दुसरा डोस - 503 एकूण 1081, रिसोड तालुका : पहिला डोस - 160 व दुसरा डोस -165 एकूण 325, कारंजा तालुका : पहिला डोस - 449 आणि दुसरा डोस -635 एकूण 1084, मानोरा तालुका : पहिला डोस - 265 व दुसरा डोस 379 एकूण 644 आणि मंगरूळपीर तालुका : पहिला डोस - 186 आणि दुसरा डोस - 403 असा एकूण 589 व्यक्तींना देण्यात आला.

0 Comments