Ticker

6/recent/ticker-posts

ए पीआय मोरे यांनी निर्भया पथक अंतर्गत महिला सुरक्षा विषयक कायदे



मंगरूळपीर दि .16 डिसेंबर रोजी  जिल्हा परिषद विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मंगरूळपिर येथे स्वातंत्र्याचा  महोत्सव अंतर्गत पोलीस स्टेशन मंगरूळपीर चा ए पी आय मोरे मॅडम आणि सहकारी यांनी निर्भया पथक अंतर्गत महिला सुरक्षा विषयक कायदे कनिष्ठ महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षण आत्मनिर्भरता चिडीमार यांपासून  स्वतःचे संरक्षण आणि कठीण प्रसंगी घ्यावयाची काळजी इत्यादी बाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
काही शासनाच्या गाइडलाइन असलेल्या हेल्पलाईन बद्दल माहिती दिली कोणत्याही प्रसंगी हेल्पलाईनवर कॉल केला तर आपल्याला तात्काळ मदत मिळेल असेही याप्रसंगी त्यांनी सांगितले

 याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक किरण पाटील प्राध्यापिका कुमारी अर्चना अवताडे प्राध्यापिका श्रीमती ठोंबरे यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाच्या ज्येष्ठ प्राध्यापिका श्रीमती सविता आतकरे  व महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दिलीप आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय तेलंग सर यांनी केले  उपस्थित सर्व विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचा लाभ घेतला


Post a Comment

0 Comments