मंगरूळपीर आगारांतील एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप गेल्या ४१ दिवसांपासून कायम आहे. त्यामुळे जनतेचा जीवघेण्या वाहनातून प्रवास सुरू आहे. अद्यापही प्रवाशांना जीवन वाहिनी म्हणून ओळखली जाणारी एस.टी.ची लालपरी रस्त्यावर परतण्याची आशा कायमच आहे. कारण माझी ताई अजून दिवाळीला आलीच नाही साहेब शासनाने जर या कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घेऊन जर मागण्या मंजूर केल्या तर निश्चितच लालपरी रस्त्यावर पुन्हा धावेल व आजी-आजोबा ताई काका मामा दादाभाऊ या लाल परी तून सुरक्षित प्रवास करतील
आमच्यावर देशहिताच्या शासकीय •विलीनीकरणाच्या मागणीसाठी मंगरूळपीर आगारांतील चालक, वाहकांसह इतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या ४१ दिवसांत मंगरुळपीर आगारांतून एकही बस बाहेर पडलेली नाही किंवा बाहेरची बस या आगारात आलेली नाही, तर ७ नोव्हेंबरपासून वाशिम जिल्ह्याच्या आगारातून बस बाहेर गेलेली नाही किंवा बाहेरची बस आगारात आलेली नाही. गुरुवारी १६ डिसेंबरलाही एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरूच होता. एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाल्यानंतर जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. खासगी प्रवासी वाहनाचा आधार जनतेकडून घेण्यात येत असला तरी सर्वांची आवडती लाल परी जर रस्त्यावर धावली तर निश्चितच आनंदाने मोकळा श्वास सुटेल अशी जनसामान्यात मागणी होत आहे या सर्व बाबींचा सरकारने विचार करून आमच्या प्रवाशांना न्याय द्यावा असेही जनसामान्यात बोलले जात आहे

0 Comments