मनरेगा योजनेतून गावाचा शाश्वत विकास करता येते, मा.श्री.नंदकुमार साहेब अपर प्रधान सचिव रोहयो यांच्या संकल्पनेतुन मजूर शेतकरी लखोपती करावयाचे आहे, करिता समृद्धी बजेट कसा बनवायचा करिता मोतसावंगा येथे जलदुत तथा मनरेगा राज्य प्रशिक्षक रवींद्र इंगोले यांनी मार्गदर्शन केले व सामाजिक कार्यकर्ता अश्विनी राम औताडे यांनी मनरेगातून गाव समृद्ध करण्यासाठी गाव दत्तक घेतले आहे.करिता गावात मनरेगाची वातावरण निर्मिती करुन, मनरेगाची माहिती दिली, यामध्ये मनरेगाची पार्श्वभूमी, मनरेगा वैशिष्ट्ये, २६२ प्रकारची कामे, कामाचा प्राधान्यक्रम समृद्धी गाव व लखोपती ही संकल्पना, मातोश्री ग्राम समृद्धी पांदण रस्ते, बांधावर वृक्ष लागवड, समृद्धी बजेट, नमूना क्रमांक १ व नमूना क्रमांक ४ भरणे , वातावरण निर्मिती याविषयी मार्गदर्शन केले व माहिती दिली. लवकरच अश्विनीताई त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावात कामे चालू करणार आहे त्यामुळे काय होईल गावातील लोकांना गावातच काम भेटेल लोकांचे स्थलांतर होणार नाही व गावात समृद्धी येईल या वेळी गावाची पाहणी करताना बिबे फोडून गोडंबी काढणे हे काम करणाऱ्या महिला मजुरांना भेट देऊन त्यांच्या समस्या अश्विनीताई नी जाणून घेतल्या गावात इतर कामं नसल्यामुळे या महिलांना नाईलाजास्तव हे काम करावे लागते त्यामुळे महिलांच्या मुलींच्या आरोग्यावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. मनरेगाची काम चालू झाले तर महिला ईतर काम भेटतील यावेळी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला यावेळी सरपंच अवलोकीका कोकरे, राहुल कोकरे, विठ्ठल वाघमारे व इतर गावकरी मंडळी उपस्थित होते.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)

0 Comments