मंगरूळपीर येथील पंचशील नगर येथे आज सोमवारी 6.डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परम पूज्य डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनी आंबेडकरी अनुयायांनी त्रिवार पंचांग प्रणाम करून अभिवादन केले ,आणि श्रद्धांजली अर्पण केली ,
यावेळी पूज्य भन्ते महाकाश्यप बुद्ध टेकडी वाटोद यांनी सामूहिक वंदना घेऊन मार्गदर्शन केले , डॉ .बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्या देशावर व आपल्यावर अनंत उपकार असून त्या उपकाराची आपण कधीच परतफेड करू शकणार नाही. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी रामकृष्ण डेरे होते तर प्रामुख्याने आत्माराम मोरे, पंजाबराव अघम, रुपराव इंगोले, महादेवराव अबोरे, पी आर मन वर, बाबाराव भगत, संतोष वानखडे, गायक भगत जांब , विनोद डेरे ,श्रध्दाताई मनवर ,सुशीला डेरे, सिमा डेरे, ममता अंबोरे (ग्रामपंचायत सदस्य ),अनिता भगत ,वैशाली खिराडे, गिरजाबाई भगत , नंदाबाईभगत ,लिलाबाई अंभोरे, लंकाबाई ,तुळसाबाई वानखडे, सुनीता वाहूळ ,सुजाता कांबळे, सुंदरबाई नितनवरे आदींनी यावेळी सामूहिक वंदना घेऊन पुष्पसुमनांनी श्रद्धांजली अर्पण केली . तर कार्यक्रमाचे संचालन व आभार विनोद डेरे अध्यक्ष पंचशिल बुद्धविहार यांनी केलेत . कार्यक्रमाला आंबेडकरी अनुयायांची उपस्थिती होती .
0 Comments