Ticker

6/recent/ticker-posts

चिडीमारांवर पोलिसांनी अंकुश ठेवावा, रा का चे अल्पसंख्यांक विभागाचे शहर अध्यक्ष शेख इरफान शे हुसेन यांनी ठाणेदारांना दिले निवेदन



चिडी मारामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता , 

भरधाव वेगाने गाडी चालवणे मुलींना कवा मारून जाणे,

शाळा कॉलेजच्या परिसरात विनाकारण फिरणाऱ्या रोड रोमी वर कारवाईची मागणी,

  शहरात चिडीमारीला उत आला असून चिडीमारांवर पोलिसांनी अंकुश ठेवावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे शहर अध्यक्ष शेख इरफान शे हुसेन यांनी मंगरूळपीर पोलीस स्टेशनचे  ठाणेदार धनंजय जगदाळे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे या करीता शालेय द्रुष्टीने शिथीलता  आणत कशाबशा शाळा सुरु करण्यात आल्या आहे. याचा गैरफायदा घेत शहरातील चौकाचौकात चिडीमार व तळीरामासह गावगुंडांनी सध्या हैदोस मांडला आहे. अश्यातच शहरातून राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग यावर वर्दळ असल्याने शहरात चिडीमार व दुचाकीस्वार जीवघेणे स्टंट करत सुसाट वेगाने वाहने चालवतात. रस्त्यावर चालणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालाव लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे मोठे संकट ओढावु शकते.  महाविद्यालयीन क्षेत्रात व महात्मा फुले चौक, बस स्थानक, अकोला चौक व ज्या ठिकाणी विद्यार्थिनी अभ्यासीका आहेत, अशा ठिकाणी कायम स्वरूपी पोलीस बंदोबस्त व निर्भया पथकाची तासा तासाने गस्त ठेवण्यात यावी. तात्काळ कार्यवाही न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले आहे की, शहरात शाळा-कॉलेजच्या परिसरात चिडीमार करणाऱ्यांची गर्दी पहावयास मिळत आहे. निर्भया पथकाची जबाबदारी फक्त कागदावरच नसून कृती करण्याची वेळ सुद्धा आली आहे . शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला

Post a Comment

0 Comments