Ticker

6/recent/ticker-posts

पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा




( कारंजा प्रतिनिधी सुनिता डोईफोडे )

शेतकऱ्यांनी सोयबीन विमा पिकासाठी ४ हजार ६८० योजना

अनेक रूपयांचा पिकविमा रक्कम म्हणून भरणा केला. मात्र, त्यांच्या खात्यात सोयाबीन पिकाच्या नुकसानीपोटी केवळ ४ हजार ४२७ रूपयाचा परतावा जमा करण्यात आले. त्यामुळे रिलायन्स पिकविमा कंपनीप्रती शेतकऱ्यातून नाराजी व्यक्त केल्या जात असून शेतकरी विमा कंपनीप्रती संतप्त देखील झाले आहेत.

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना सुरक्षकवच मिळावे म्हणून केंद्रसरकारच्या वतीने पंतप्रधान पिकविमा योजना सुरू करण्यात आली. तसेच या योजनेत सहभागी होण्यासाठी शासन प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आल्याने सन २०२१-२२ च्या खरीप हंगामात कारंजा तालुक्यात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले. वाशिम जिल्ह्यात रिलायन्स क्रॉप इन्शुरन्स कंपनीच्या वतीने पिकविमा उतरविण्यात आला होता. मागील वर्षीच्या खरीप हंगामातील सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या नुकसान झाल्यापासून ७२
तासाच्या आत तक्रार करावी, या अटीनुसार ऑनलाईन व ऑफलाईन तक्रारीही केल्या. परंतु अद्यापपर्यंत विमाकंपनीकडून शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम मिळाली नव्हती. अशातच कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी विमा कंपनीला आठ दिवसाचा अल्टीमेटम दिल्याने विमा कंपनी नरमली. आणि सोमवार ६ डिसेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविम्याची रक्कम जमा करण्यास सुरूवात झाली. त्यानुसार कारंजा तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात देखील पिकविम्याची रक्कम जमा करण्यात आली. परंतु ही रक्कम पिकविमा म्हणून भरलेल्या रकमेपेक्षा कमी असल्याने वाशिम जिल्ह्यात रिलायन्स पिकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा केली जात असल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments